आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dropout Sachin, Dravid, Laxman, Former Criketer Apeals

'तेंडूलकर, द्रविड, लक्ष्मणला संघातून तत्काळ काढून टाका'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियात सपाटून मार खात भारतीय संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या संकटात मात्र बीसीसीआय संघ व खेळाडूच्या पाठिशी असल्याचे काहीसे दिसून येत आहे. तर, काही माजी खेळाडूंनी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंवर टीकेची झोड उठवली असून त्यांना घरचा रस्ता दाखवा, असेही म्हटले आहे. यात सचिन तेंडूलकर याचाही समावेश आहे.
माजी कसोटीपटू कीर्ती आझाद यांनी भारतीय संघावर हल्ला चढवताना म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना टीममधून वगळले जावे. निवड समितीने याचा विचार करायला हवा. संघाची कामगिरी खराब होत असतानाही हे वरिष्ठ खेळाडू चांगली कामगिरी न करता संघात चिकटून राहत असतील आणि निवृत्त होत नसतील, त्यांना संघातून वगळण्यास आणखी वेळ दडवण्याची गरज नाही.
दुसरीकडे, बीसीसीआयचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी भारतीय संघाची बाजू घेत म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिया दौरयावर गेलेले भारतीय संघातील खेळाडू सर्वश्रेष्ठ आहेत. तसेच जगातील कोणत्याही संघाला हरविण्याची त्यांची क्षमता आहे.भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार कसोटीच्या मालिकेत ०-३ असा पिछाडीवर पडला आहे. याबाबत श्रीनिवासन म्हणाले, टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनामुळे आम्ही हैरान आहोत. कारण टीमकडून आम्हाला ऑस्ट्रेलियात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.
असे असली तरी हा संघ इतका मजबूत आहे की, तो कोणत्याही संघाला हरवू शकतो. आम्हाला चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. प्रत्येक सामना किंवा मालिका जिंकता येत नाही. तरीही संघाला विजय मिळवता यायला हवा होता. पण भारताला नशीबाची साथ मिळत नाहीये. मी खेळाडूच्या खराब कामगिरीचा बचाव करीत नाही. पण आणखी थोडा वेळा थांबले पाहिजे की टीम कशी कामगिरी करते. मगच काही निर्णय घेतली जातील.
वासिम अक्रमने उडवली भारतीय संघातील वरिष्‍ठांची थट्टा
शेपटाला पळता भुई थोडी!
घायाळ टीम इंडियाच्‍या जखमेवर पीटर सिडलने चोळले मीठ