आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीआरएस स्विकारणा-या देशांच्या दौ-यावर बीसीसीआय टाकणार बहिष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - भारताने पंच निर्णय प्रणालीचा (डीआरएस) आपला विरोध अद्याप कायम ठेवला आहे. या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इतर क्रिकेट मंडळांना जाहीर धमकी दिली आहे. डीआरएसला स्वीकृती देणा-या देशांच्या दौ-यावर बीसीसीआयने स्पष्ट बहिष्कार टाकण्याचेही संकेत दिले आहेत.
भारताच्या धमकीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत डीआरएसचा वापर करण्यात येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. इतर संघ आपल्या मालिकेत याचा वापर करत आहेत. मात्र, भारताने धमकी
दिल्यामुळे आता आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मंडळ अडचणीत सापडली आहे.

क्लार्कव्यतिरिक्त सर्वांचे मौन
कार्यकारी समितीच्या बैठकीत दहा कायम व तीन स्वीकृत सदस्यांनी सहभाग घेतला होता. क्लार्क वगळता इतर कोणत्याही सदस्याने डीआरएसवरील चर्चेची मागणी केली नाही. त्याने डीआरएसमधील बदलासाठी सीईसीकडे केलेल्या शिफारशीचे समर्थन केले.
काय म्हणते बीसीसीआय

सध्याची डीआरएस नियमावली पूर्णपणे प्रगल्भ नाही. यामध्ये अनेक उणिवा आहेत, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. क्वालालंपूर येथील बैठकीतही बीसीसीआयने डीआरएसला विरोध केला होता. यामुळे इतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.मात्र, बीसीसीआयने आपली भुमिका कायम ठेवली.