Home »Sports »Other Sports» Dubai Open Tenins : Anna Evanovic Entered Second Round

दुबई ओपन टेनिस: अ‍ॅना इव्हानोविकची दुस-या फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 02:41 AM IST

  • दुबई ओपन टेनिस: अ‍ॅना इव्हानोविकची दुस-या फेरीत प्रवेश

दुबई - सर्बियाची टेनिसपटू अ‍ॅना इव्हानोविकने डब्ल्यूटीए दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली. इव्हानोविकने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेंकोवोचा 6-3, 7-6 ने पराभव केला.

दुसरीकडे कझाकस्तानच्या युलिया पुटित्सेवाने इंग्लंडची लाउरा रॉबसनला 6-4, 2-6, 7-6 ने पराभूत केले.
उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने कतार ओपनमधून बाहेर पडलेल्या इव्हानोविकने मंगळवारी शानदार विजयी सुरुवात केली. सर्बियाच्या टेनिसपटूने पहिला सेट सहजपणे 6-3 ने जिंकला. मात्र, तिला दुस-या सेटमध्ये मोठी कसरत करावी लागली. रशियाच्या अनास्तासियाने दुस-या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले. तिने सलग चार गेम जिंकून 4-0 ने आघाडी मिळवली होती.मात्र, इव्हानोविकने सलग सहा गेम जिंकून 6-6 ने बरोबरी मिळवता आली. त्यानंतर हा रोमांचक सेट ट्रायब्रेकरपर्यंत रंगला. अखेर सर्बियाच्या खेळाडूने आक्रमक सर्व्हिस करून दुसरा सेट 7-6 ने जिंकून अनास्तासियाला धूळ चारली.

Next Article

Recommended