आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई ओपनमध्ये नोवाक योकोविक चॅम्पियन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोवाक योकोविकने दमदार प्रदर्शन करताना दुबई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये त्याने चेक गणराज्यचा खेळाडू थॉमस बर्डिचला 7-5, 6-3 ने हरवले.
दुबई ओपन टेनिस स्पर्धेत सहाव्यांदा सहभागी होताना सर्बियाच्या या खेळाडूने पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. कारकीर्दीतील हे त्याचे 36 वे विजेतेपद ठरले. गेल्या 18 सामन्यांपासून तो सलगपणे विजयी ठरत आहे. पहिल्या सेटमध्ये बर्डिचने थोडा संघर्ष केला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये तो आव्हान सादर करू शकला नाही. मात्र, त्याच्या वेगवान सर्व्हिसने प्रेक्षकांच्या टाळ्या निश्चितपणे मिळवल्या.