Home »Sports »From The Field» Dubai Tennis Championships: Open Tennis Petra In Final

पेत्रा क्वितोव्हा-सारा इराणीमध्ये रंगणार फायनल

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 08:01 AM IST

  • पेत्रा क्वितोव्हा-सारा इराणीमध्ये रंगणार फायनल

दुबई - माजी विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोव्हा व इटलीची सारा इराणी यांच्यात डब्ल्यूटीए दुबई ओपन टेनिस स्पर्धेचा फायनल मुकाबला होणार आहे. चेक गणराज्याच्या क्वितोव्हाने उपांत्य लढतीत डेन्मार्कची टेनिसपटू वोज्नियाकीला 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.

या विजयासह क्वितोव्हाने अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे इटलीच्या साराने उपांत्य सामन्यात रॉबर्टा व्हिन्सीवर 6-3, 6-3 ने विजय मिळवला. चेक गणराज्याची 22 वर्षीय टेनिसपटू पेत्रा क्वितोव्हाने आक्रमक सुरुवात केली. यातून तिच्यासमोर माजी नंबर वन टेनिसपटू वोज्नियाकीचा फार काळ निभाव लागला नाही. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या क्वितोव्हाने सहजपणे पहिला सेट 6-3 ने जिंकला. दरम्यान, डेन्मार्कच्या खेळाडूने दुसर्‍या सेटमध्ये पुनरागमनाचा प्रयत्न केला. तिने सलग तीन गेम जिंकून दुसर्‍या सेटमध्ये बरोबरी मिळवली होती. मात्र माजी विम्बल्डन विजेत्या खेळाडूने तिचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. तिने वेगवान सर्व्हिस करत दुसरा सेट 6-4 ने जिंकून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

उपांत्य फेरीचा निकाल
पेत्रा क्वितोव्हा वि.वि. कॅरोलिन वोज्नियाकी (6-3, 6-4)
सारा इराणी वि.वि. रॉबर्टा व्हिन्सी (6-3, 6-3)

साराची व्हिन्सीवर मात
दुसर्‍या उपांत्य सामन्यात इटलीच्या सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी यांच्यात रंगतदार लढत झाली. साराने महिला दुहेरीतील आपली सहकारी रॉबर्टाला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. महिला दुहेरीच्या रँकिंगमध्ये सारा-रॉबर्टा ही जोडी अव्वलस्थानी आहे. साराने हा उपांत्य सामना 6-3, 6-3 अशा फरकाने जिंकला. दोन्ही सेटमध्ये रॉबर्टा व्हिन्सीला अपयशाचा सामना करावा लागला.

Next Article

Recommended