आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Bollwers Poor Performance India Defeated Mahindrasingh Dhoni

गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव - महेंद्रसिंग धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात 141 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर हा पराभव गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे झाला असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे.आमच्यासाठी मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खूप वाईट ठरला. या खेळपट्टीवर 350 धावा बनवल्या जाऊ शकतील असे मला नाही वाटत, परंतु आमच्या गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. फलदाजांना दोष देऊन चालणार नाही. शिवाय आमच्या 2-3 दिवसांच्या चांगल्या सरावानंतरसुध्दा अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्याचे वाईट वाटते, असेही महेंद्रसिंग धोनी या वेळी म्हणाला. दुस-या वनडेत त्याने चांगल्या कामगिरीची आशा व्यक्त केली आहे.
धवनच्या चौकाराने भारत शिखरावर
भारतीय संघाने गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या द. आफ्रिकेविरु द्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पहिली धाव काढताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा बनवण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यापूर्वी भारत व ऑस्ट्रेलियाच्या समान 1, 82, 881 धावा होत्या. सर्वोच्च् धावसंख्येचा कळस गाठण्यासाठी भारताला फक्त एक धाव आवश्यक होती. सलामीवीर शिखर धवनने सामन्याच्या दुस-या षटकात सोत्सोबेच्या गोलंदाजीवर चौकार मारून भारताला अव्वल स्थान मिळवून दिले.
विजयाने हुरळून जाऊ नका : एबी डिव्हिलियर्स
कागदावर बलाढ्य वाटणा-या टीम इंडियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वच पातळ्यांवर पाणी पाजणा-या द. आफ्रिकन खेळाडूंनी जमिनीवरच राहायला हवे. एकच सामना जिंकला असल्यामुळे त्यांनी मालिका जिंकल्याच्या अविर्भावात राहू नये. भारतीय संघांची कामगिरी एकाच सामन्यात मोजता येण्यासारखी असून ते कोणत्याही क्षणी पुनरागमन करु शकतात असा इशारा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने आपल्या संघातील खेळाडूंना दिला आहे. पुढचा सामना डर्बन येथे होणार असून येथील वातावरण भारताशी मिळतीजुळती आहे, त्यामुळे त्यांना याचा फायदा मिळू शकतो असेही तो म्हणाला.