आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांना मातृशोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- टीम इंडियाचे मुख्य कोच डंकन फ्लेचर यांच्या आईचे निधन झाले. आईच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहण्यासाठी फ्लेचर केपटाऊनला (दक्षिण आफ्रिका) रवाना झाले आहेत, अशी माहिती टीम इंडियाचे मीडिया मॅनेजर डॉ. आर. एन. बाबा यांनी दिली.

बर्मिंगहॅम येथे वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना झाल्यानंतर लगेचच रात्री फ्लेचर आपल्या मायदेशी रवाना झाले. त्यांची आई झिम्बाब्वेची होती. फ्लेचर यांच्या आईचे रविवारी निधन झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन विजय मिळवून टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. दुसरीकडे सलग दोन पराभवांमुळे पाक संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. आता भारत-पाक सामना 15 जून रोजी होईल.