आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duncan Fletcher Lucky To Get An Extension After Poor Record

डंकन फ्लेचर यांना संजीवनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्या कर्णधारपदाच्या अपयशाचे खापर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यावरही फोडले जात होते. मात्र ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध यशाचा परिसस्पर्श धोनीला गवसला आणि त्याबरोबरच अन्य समीकरणेही बदलायला लागली. डंकन फ्लेचर यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी यंदाच्या मार्च महिन्यातच संपत होता. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यश मिळवल्यानंतर फ्लेचर यांच्या कारकीर्दीलाही संजीवनी मिळाली असून बीसीसीआयच्या कार्यकारिणीने आज मुंबईतील बैठकीत फ्लेचर यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
भारतीय संघाला यशाच्या शिखरावर नेणार्‍या प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचे ते गुरू होते. त्यामुळे कर्स्टन यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, फ्लेचर यांच्या नियुक्तीनंतर कसोटीत पहिल्या क्रमांकावरून भारताची पाचव्या स्थानावर घसरगुंडी झाली होती.