आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लेचरनंतर शास्त्री व्हावेत प्रशिक्षक - अयाज मेमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयाज मेमन यांच्या लेखणीतून
भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक भारतीय असेल की परदेशी, याचे रहस्य दिवसेंदिवस वाढत आहे. डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ ३१ मार्चला संपला. गेल्या सहा-सात महिन्यांपासून फ्लेचर शक्तिहीन दिसत होते. टीमचे डायरेक्टर रवी शास्त्रींचा उदय होत होता. संघाची कामगिरी सुधारण्याची जबाबदारी शास्त्री यांच्यावर टाकण्यात आली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आता त्यांनाच प्रशिक्षक करण्याची मागणी जोर धरत आहे. शास्त्री संघाचे डायरेक्टर व्हायच्या आधी टीम इंडियाची कामगिरी काहीशी गचाळ झाली होती.
द.आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यात संघाने सपाटून मार खाल्ला होता. जबाबदारी सांभाळताच शास्त्री यांनी काही बदल केले. फ्लेचर यांचे सहकारी ट्रेवर पेनी आणि जो दावेस यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी संजय बांगर (फलंदाजी प्रशिक्षक), भरत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि श्रीधर (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांना नेमले. या तिघांच्या कामगिरीवर शास्त्री समाधानी असून तिघांनी कायम राहावे असे त्यांना वाटते. तांत्रिकदृष्ट्या हे तिघे फ्लेचर यांना तर फ्लेचर शास्त्री यांना अहवाल देतात. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक (जॉन राइट, ग्रेट चॅपेल, गॅरी कर्स्टन, डंकन फ्लेचर) आपल्या सहकारी संघात परदेशींनाच नेमत. रवी शास्त्रींनी संघाच्या कामगिरीत सुधार आणला आहे. अशा वेळी प्रश्न पडतो की, टीम इंडियाचा प्रशिक्षक भारतीय असेल की परदेशी?

विश्वचषकाहून परतल्यावर मी शास्त्री यांच्याशी चर्चा केली. सहकारी स्टाफच्या कामगिरीवर ते आनंदी आहेत. संघाच्या गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणात खूपच सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. विश्वचषकात हे सिद्धच झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजी चांगली झाल्यामुळेही शास्त्री खुश आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीने शानदार फलंदाजी केल्याचे ते म्हणाले.
बांगर, अरुण, श्रीधर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि आयपीएल संघांशी जोडले गेले आहेत. ते आपली भूमिका व्यवस्थित पार पाडत असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. त्यांचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरला. परदेशी सहकारी स्टाफ असेल तर इतका लाभ मिळत नाही. प्रशिक्षक परदेशी असावा की भारतीय, याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही. आतापर्यंत झालेल्या परदेशी प्रशिक्षकांनी पॉवर गेमवर जोर दिला होता. ग्रेग चॅपेल यांनी पदाचा दुरुपयोग केला हे याचे उदाहरण. परदेशी प्रशिक्षकांशी आपल्या खेळाडूंचा ताळमेळ नीट जमत नाही. भारतीय पद्धत समजायला परदेशी प्रशिक्षकांना वेळ लागतो. रवी शास्त्री आणि कंपनीला भारतीय संघाची जबाबदारी दिली तर संघाची कामगिरी आणखी चांगली होऊ शकते.
अनेक खेळाडूंनी शास्त्रींवर स्तुतिसुमने उधळल्यामुळे त्यांनाच प्रशिक्षक करण्याची मागणी होऊ लागली आहे. हिंदी भाषेत भारतीय खेळाडूंना शास्त्री समजून घेऊ शकतात. शिवाय शास्त्रीकडे सर्व खेळाडूंशी जुळवून घेण्याची कलाही भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकते. टीम इंडियाच्या सहकारी स्टाफमध्ये माजी खेळाडू संजय बांगर, भरत अरुण आणि एस.श्रीधरसारखी ित्रमूर्ती असल्यास सर्वोत्तम. मात्र असे होणार का, याचे उत्तर काळच देईल.