आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dwayne Johnson Reveals Step By Step Instructions For Fans, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'रॉक\'सारखी बॉडी घडवणे झाले सोपे, ड्वेन जॉन्‍सन देतोय स्‍वत: प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - माजी व्‍यावसायिक रेसलर आणि अभिनेता ड्वेन जॉन्‍सन सारखी बॉडी बनविने आ‍ता सोपे झाले आहे. कारण खुद्द जॉन्‍सनच आपल्‍याला बॉडी बनवायला मार्गदर्शन करणार आहे. आपण फक्‍त ऑनलाईन असायला हवे. असा खुलासा जॉन्‍सनने आपला आगामी चित्रपट 'हर्कुलस' च्‍या प्रमोशनच्‍याव‍ेळी केला.
चाहत्‍यांना केले मार्गदर्शन
द रॉक नावाने सर्व चाहत्‍यांमध्‍ये सुपरचित असलेल्‍या जॉन्‍सने पाठीचा व्‍यायाम करत असतानाची छायाचित्रे सोशल साईट्स इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केली. काही चाहत्‍यांनी त्‍यावर विचारणा करताच त्‍याने त्‍यांच्‍या प्रश्‍नांची उत्‍तरेही दिली. एका चाहत्‍याला त्‍याने लिहीले आहे की, ''मी माझ्या पाठीचा व्‍यायाम 'हर्कुलस' चित्रपटासाठी तयार केला आहे. जर तुला माझ्यासारखी बॉडी बनवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर व्‍यायाम करावा लागेल. त्‍याचवेळी माझ्यासारखी पोलादी बॉडी बनेल''.
10-10 सेट
जॉन्‍सने म्‍हटले की, ''संपूर्ण बॉडीचा शेप बदलायाचा असेल तर तुम्‍हाला आठवड्यामध्‍ये सर्व व्‍यायामाच्‍या साधनांचे 10-10 सेट मारावे लागतील. सोबत आपणाला आहारावरही लक्ष केंद्रीत करावे लागेल. किंमान 4000 कॅलरीज नियमित घ्‍याव्‍या लागतील.
प्रत्‍येक आठवड्याला मार्गदर्शन
जॉन्‍सने चाहत्‍यांना म्‍हटले आहे की, हे फक्‍त व्‍यायामाच्‍या बाबतीतील टिप्‍स झाली. जेव्‍हा आपण नियमित व्‍यायाम करायला लागाल तेव्‍हा दर आठवड्याला काय प्रोग्रेस झाला ते कळवत जा त्‍यानंतर मी तुम्‍हाला मार्गदर्शन करेल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जॉन्‍सद्वारे इस्‍टाग्रामवर पोस्‍ट केलेली छायाचित्रे...