आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Easborn Interantional Tenis: Randawaska Defeated In First Round

ईस्टबोर्न इंटरनॅशनल टेनिस : रंदवांस्का पहिल्याच फेरीत पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईस्टबोर्न (इंग्लंड) - अव्वल मानांकित पोलंडच्या एग्निजस्का रंदवांस्काला ईस्टबोर्न इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या जेमी हॅप्टनने रंदावांस्काला 7-6, 6-2 ने पराभूत केले. इतर एका सामन्यात चीनची ली ना, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी आणि चेक गणराज्यची पेत्रा क्वितोवा यांनी विजय मिळवून दुस-या फेरीत प्रवेश केला.


गत विम्बल्डन उपविजेती रंदावांस्का आणि हॅप्टन यांच्यातील पहिल्या फेरीचा सामना चांगलाच रोमांचक ठरला होता. रंदावांस्काने पहिल्या सेटमध्ये चांगलाच संघर्ष केला. यामुळे सामना टायब्रेकपर्यंत खेचला गेला. मात्र, टायब्रेकमध्ये अमेरिकेच्या खेळाडूने पुनरागमन करताना पहिला सेट 7-2 ने जिंकला. दुस-या सेटमध्ये पोलंडच्या खेळाडूला पुनरागमन करता आले नाही. हॅप्टनने दुसरा सेटसुद्धा सहजपणे जिंकून अव्वल मानांकित रंदावांस्काला स्पर्धेबाहेर केले.


ली ना हिचा सहज विजय
चीनच्या ली ना हिने फ्रान्सच्या एलाइज कोर्नेटला सरळ सेटमध्ये 6-2, 6-4 ने हरवले, तर चौथी मानांकित आणि माजी विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोवाने रोमानियाच्या मोनिका निकालस्कूला 6-4, 6-1 ने मात दिली. तिसरी मानांकित जर्मनीच्या अँलोलिक कर्बरने रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाला 6-4, 6-4 ने हरवले. पाचवी मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीने ऑस्ट्रियाच्या तामिरा पास्जेकला 6-2, 6-2 ने, तर चेकच्या लुसी सॅफारोवाने आपल्याच देशाच्या जाकोपालोवाला 6-4, 7-6 ने हरवले.