आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिती झिंटाची अंमलबजावणी संचालनालयाकडून 10 तास चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयपीएलप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून अभिनेत्री प्रिती झिंटाची जवळपास 10 तास चौकशी करण्‍यात आली. आयपीएल-2 क्रिकेट स्‍पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी झालेल्‍या परकीय चलन व्‍यवहाराबाबत ही चौकशी करण्‍यात आली. किंग्‍स एलेव्‍हन पंजाब या संघाची सह-मालकी प्रिति झिंटा आहे. काल सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत तिची चौकशी करण्‍यात आली. या संघाची मालकी विकत घेण्‍यासाठी तिने पैसा कुठुन मिळविला, याबाबत तिला विचारणा करण्‍यात आली.