आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीग: लिव्हरपूलची वेस्टहॅमवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - लिव्हरपूलने शानदार विजय मिळवताना इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगच्या गुणातालिकेत अव्वल स्थान गाठले. लिव्हरपूलने सामन्यात वेस्टहॅम युनायटेडला 2-1 अशा फरकाने नमवले. स्टीव्हन गेरार्डने (44, 71 मि.) केलेल्या दोन गोलच्या बळावर लिव्हरपूलने सामना जिंकला. वेस्टहॅम युनायटेड टीमकडून डेमेलने 45 व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल व्यर्थ ठरला.
लिव्हरपूलचा लीगमधील हा 23 वा विजय ठरला. अवघ्या दोन गुणांच्या आघाडीने लिव्हरपूलने (74 गुण) पुन्हा एकदा चेल्सीवर (72 गुण) कुरघोडी करून अव्वलस्थानी धडक मारली. यातून चेल्सीची दुसºया स्थानी घसरण झाली.
अपटॉन पार्कवर लिव्हरपूल आणि वेस्टहॅम युनायटेड यांच्यातील सामना रंगतदार झाला. सामन्याच्या 44 व्या मिनिटाला स्टीव्हन गेरार्डने गोल करून लिव्हरपूलकडून गोलचे खाते उघडले. यासह लिव्हरपूलने 1-0 ने आघाडी घेतली होती.
आर्सेेनलचा 0-3 ने पराभव
इव्हरटोनने आर्सेनलवर 3-0 ने एकतर्फी विजय मिळवला. नैस्मिथ (14मि.), लुकाकू (34 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर इव्हरटोनने सामना आपल्या नावे केला. यात आर्सेनलच्या आर्टेटाने इव्हरटोनच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. त्याने 61 व्या मिनिटाला आत्मघातकी गोल केला.