आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Pakistani Cricketers Will Have To Pay A Fine Of 300 Dollar Each

आफ्रीदीसह अाठ पाकिस्तानी क्रिकेटपटूंना शिस्‍तभंगामुळे विश्‍वचषकापूर्वीच ठोठावला दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक 2015 चे थाटात उद्घाटन झाले आहे. विश्‍वचष्‍ाकाचे ख-या अर्थाने बिगूल वाजले आहे. मात्र, विश्‍वचषकाच्‍या प्रारंभापूर्वीच पाकिस्‍तानच्‍या आफ्रीदीसह 8 खेळाडूंवर आयसीसीने प्रत्‍येकी 300 ऑस्‍ट्रेलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे. त्‍यामध्‍ये उमर अकमल आणि अहमद शहजाद यांच्‍या नावाचाही समावेश आहे.
हॉटेलमध्‍ये उशिरा परतल्‍याने झाला दंड
पाकिस्तान संघ वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी सिडनीमध्ये दाखल झाला. संघातील आठ खेळाडू बुधवारी रात्री पाऊण तास उशिरा हॉटेलमध्ये परतल्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कारवाई केली. हे खेळाडू बुधवारी रात्री आपल्या मित्रांना भेटायला सिडनी शहरात गेले होते; पण हॉटेलवर पाऊण तास उशिरा आले. खेळाडूंनी माफी मागितली आहे.
३०० ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे 14300 रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर पुन्हा अशी चूक झाल्यास संघाला स्पर्धेतून बाहेर काढण्याचा इशाराही दिला आहे. अनुभवी फलंदाज शाहीद आफ्रिदीचाही या आठ जणांमध्ये समावेश आहे, अशी माहिती पाकिस्तान संघ व्यवस्थापनसूत्रांनी दिली.माजी सैनिक अािण टीम मॅनेजर नावेद चीमाने या आठ खेळाडूंना दंड आकारला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषकाचे वेळापत्रक