लंदन - दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नची माजी प्रेयसी एलिझाबेथ हर्ले आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वॉर्नपासून हर्ले विलग झाली असली तरी त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे कनेक्शन आजही आहे.
लिज हर्ले हियरफोर्डशायरमधील डॉडिंग्टन हॉलमध्ये राहते. हा आलिशान बंगला लिज आणि शेनवॉर्न यांनी मिळून खरेदी केला होता. परंतु वॉर्नसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर एलिझाबेथने त्या बंगल्याचे वॉर्नचा शेअर्स विकत घेवून तेथे राहत आहे.
गेल्या वर्षीपासून एलिझाबेथ वॉर्नला विवाहासाठी मागणी घालत होती. त्याला कंटाळून शेन वॉर्न तिच्यासोबत ब्रेकअप घेतले.
चार वर्षे सुरु होती डेटिंग
वॉर्न आणि हर्लेचे चार वर्षे अफेअर चालले. दोघांची चुंबनदृष्य एका ब्रिटीश पृत्तपत्राध्ये प्रदर्शित झाले होते. आयपीएल दरम्यान हे जोडपे भारतात आले होते.
30 सप्टेंबर 2011 रोजी वॉर्नने नीळ्या रंगाच्या अंगठीसह हर्लेला प्रपोज केले होते. दोघांमध्ये चांगली ट्युनिंग जुळून आली असतानाच लग्नाच्या कारणावरुन दोघेही एकमेकांपासून17 डिसेंबर 2013 रोजी विभक्त झाले.
वॉर्नवर आजही प्रेम
गेल्या महिन्यात हर्लेने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, वॉर्नपासून विभक्त् झाल्याने फार वाईट वाटत्ो आपण आज ही वॉर्नवर प्रेम करत असून वॉर्न सोबत द्यायला तयार नाही.
तर वॉर्नला या विषयी विचारताच, 'आम्ही जरी एकमेकांपासून विभक्त झालो असलो तरी चांगले मित्र आहोत.' असे सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा, वॉर्न आणि हर्ले यांची काही संस्मरणीय छायाचित्रे...