आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emma Released, Then Reinstated Following Arrest, Divya Marathi

WWE: च्‍या \'डांसिंग क्वीन\'ने चोरला आयपॅड, एक दिवस समाजसेवा करण्‍याची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयार्क - डब्ल्यूडब्ल्यूईमधील डान्सिंग क्‍वीन म्‍हणून ओळखल्‍या एमाला चोरी केल्‍याप्रकरणी एक दिवसाची समाजसेवा करण्‍याची शिक्षा मिळाली आहे.
एमाने हॉर्टफोर्ट मधील एका मार्कटमधील एक आयपॅड चोरला होता. या प्रकरणामुळे पोलिसांनी एमाला अटक केली आहे. नंतर तिला लवकरच जमानत मिळाली. अशी माहिती डब्ल्यूडब्ल्यूईच्‍या ऑफिशियल साइटवर दिली आहे.
समाजसेवेची शिक्षा आणि 1262.38 रुपयांचा दंड
कोर्टाने एमाला एक दिवस समाज सेवा करण्‍याची शिक्षा तर 21.14 यूएस डॉलर (1262.38 रुपये) दंड ठोठावण्‍यात आला आहे. जेव्‍हा एमा वालमार्ट बाहेर येत होती तेव्‍हा गेटवर सायरन वाजायला लागला. वॉलमार्टच्‍या अधिका-यांनी तपासणी केली असता एमा आयपॅड चोरुन घेवून जात असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.
काय म्‍हणाले एमाचे वकील ?
एमाचे वकील हुबर्ट सांतोसने म्‍हटले आहे की, ''ही अवचित घडलेली घटना आहे. एमाने सर्व साहित्‍याचे बील पेड केले आहे. पंरतु चुकीने ती आयपॅडचे बील पेड करु शकली नाही, तिने ग्‍वाही दिली आहे की ती समाजसेवा करेल''.
पहिली ऑस्‍ट्रेलियन महिला रेसलर
एमाचे संपूर्ण नाव टेनिली एवेरिल दाशवुड असून तिचा जन्‍म 1 मार्च 1989 रोजी ऑस्‍ट्रेलियामधील मेलबर्नमध्‍ये झाला. डब्ल्यूडब्ल्यूईमध्‍ये ऑस्‍ट्रेलियातर्फे खेळणारी ती पहिली महिला रेसलर ठरली आहे.
(फोटोओळ- एका कार्यक्रमादरम्‍यान डांन्‍स करताना एमा)
पुढील स्‍लाइडवर पाहा, एमाची काही निवडक छायाचित्रे....