आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineer: I Would Have Sorted Jadeja Anderson Issue In Minutes

केवळ पाच मिनिटांचे प्रकरण : इंजिनिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा या दोघांमधील कथित संघर्षापेक्षाही त्यानंतरच्या निर्णय प्रक्रियेचे पडसाद अधिक गंभीर आहेत. मी असतो तर या प्रकरणाचा अवघ्या पाच मिनिटांत सोक्षमोक्ष लावला असता, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी कसोटीपटू यष्टिरक्षक फारूख इंजिनिअर यांनी व्यक्त केले.

हे प्रकरण एवढे लांबवण्याची खरे तर गरजच नव्हती. त्याबाबत सामनाधिकारी आणि आयसीसी यांनाच दोषी धरले पाहिजे. मी जर त्या जागी असतो, तर जिमी आणि जडेजा यांना मी एकाच रूममध्ये बोलावून समोरासमोर बसवून समेट घडवून आणला असता. मी अवघ्या पाच मिनिटांत प्रकरण निकाली काढले असते, असेही यावेळी फारख इंजिनियर यांनी सांगितले.