बर्मिंगहॅम - कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत सलग दोन विजय मिळवून
टीम इंडिया लयीत आली आहे. मंगळवारी दोन्ही संघांदरम्यान मालिकेतील चौथा एकदविसीय सामना रंगणार असून भारताकडे मालिका विजयाची संधी आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत २-० ने पुढे असून मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
१९९० पासून भारताला इंग्लंडमध्ये द्विपक्षीय मालिका जिंकण्यात अद्याप यश आलेले नाही. यापूर्वी, अखेरीस १९९० मध्ये अझहरच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका २-० ने िजंकली होती. आता २४ वर्षांनंतर धोनी िब्रगेडकडे इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी असेल. इंग्लंडविरुद्ध दोन वनडे सामने िजंकल्यानंतर भारतीय संघ प्रत्येक क्षेत्रात विरोधी संघापेक्षा उजवा िदसत आहे. कसोटी मालिकेत दुबळे ठरलेले फिरकीपटू वनडेत उपयोगी ठरत आहेत. वनडे मालिकेत भारताकडून सुरेश रैना, अंबाती रायडू, रविचंद्रन अिश्वन, अिजंक्य रहाणे आिण रवींद्र जडेजा हुकमी एक्के ठरले आहेत.
सलामीचिंतेचा विषय
भारतीयसंघ इंग्लंड दौऱ्यावर सलामीवीर िशखर धवन आिण वेगवान गोलंदाजीमुळे िचंतेत आहे. सलगपणे संधी िमळूनही धवन अपयशी ठरल्याने टीम इंिडयाची डोकेदुखी वाढली आहे. असे असले तरीही विजयी संघात बदल होण्याची शक्यता नाही. यामुळे धवनला आणखी संधी िमळेल, असेच चित्र आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या सलामीवीरांनी दोन्ही सामन्यांत ५० पेक्षा अिधक धावांची भागीदारी केली. अशा परिस्थितीत भारताच्या गोलंदाजीत बदल शक्य आहे. ितसऱ्या वनडेत मोहित जखमी झाला होता. त्याच्या जागी उमेश यादवला संधी िमळू शकते.
फिरकीपटूंपुढे इंग्लंडचे लोटांगण
इंग्लंडचाविचार केला तर त्यांनी मागच्या दोन्ही सामन्यांत चांगली सुरुवात केली. मात्र, नंतर त्यांचा डाव गडगडला. त्यांचे फलंदाज
आपल्या फिरकीपटूंपुढे संघर्ष करताना िदसले. भारतीय िफरकीपटूंनी इंिग्लश फलंदाजांना सरेंडर करण्यास भाग पाडले. इंग्लंडचा कर्णधार कुकनेसुद्धा ितसऱ्या वनडेनंतर कबुली िदली. आमच्या फलंदाजांना मोठी खेळी करावी लागेल, असे कुक म्हणाला.
कोहलीच्या कामगिरीवर लक्ष
इंग्लंडदौऱ्यात भारताचा युवा फलंदाज
विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. कसोटी मालिकेत त्याचे अपयश ठळकपणे दिसून आले. वनडे मालिकेतही त्याला अद्याप अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. मात्र, भारताच्या विजयाआड त्याचे अपयश झाकले गेले आहे. मागच्या सामन्यात कोहलीने ४० धावांची खेळी करीत फॉर्मात येण्याचे संकेत िदले. चौथ्या वनडेत कोहली कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
रहाणे की विजय ?
जखमीरोहित शर्माच्या जागी टीम इंिडयात मुरली विजयचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या वनडेत विजयला खेळवण्याचा िनर्णय झाल्यास अिजंक्य रहाणेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. मात्र, टीम इंिडयाने आगामी वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने ितसरा सलामीवीर म्हणून रहाणेला पसंती िदली तर या सामन्यात तोच सलामीला खेळेल. कर्णधार धोनीची रणनीती महत्त्वपूर्ण असेल. मुरली विजयने कसोटी मालिकेत भारताकडून चांगली कामगिरी केली होती. मात्र, वनडे संघात त्याला स्थान मिळू शकले नाही. नंतर रोहितच्या जागी त्याला संधी मिळाली. उद्याच्या लढतीत कोण खेळेल ? रहाणे, मुरली विजय की िशखर धवन..हे पाहणे रोमांचक ठरेल.
दोन्ही संभाव्य संघ
भारत :महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कर्ण शर्मा, मोहित, उमेश यादव, मो. शमी, धवल कुलकर्णी.
इंग्लंड : अॅलेस्टरकुक (कर्णधार), अलेक्स हेल्स, गॅरी बॅलेंस, इयान बेल, ज्यो. रूट, इयान मोर्गन, जोस बटलर, मोईन अली, वोक्स, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, ट्रेडवेल, िस्टव्हन िफन, हॅरी गुर्ने, िक्रस जॉर्डन.