आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • England And Australian Cricketers In Bat Tampering Controversy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट पुन्हा वादात : बॅटसोबतही छेडछाड करतात खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेली अ‍ॅशेस मालिका वादात सापडली आहे. खेळाडूंनी खेळताना बॅटवर सिलिकॉन टेप्स लावाल्याचा गंभीर आरोप होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या चॅनल नाईन सह तेथील अनेक वृत्तपत्रांच्या या वृत्ताने खळबळ उडवून दिली आहे.

चॅनल नाईनच्या वृत्तानुसार हॉटस्पॉटपासून वाचण्यासाठी खेळाडू बॅटला सिलिकॉन टेप्स लावत आहेत. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हे वृत्ताचे खंडन केले आहे.

पीटरसन संतप्त
इंग्लंडचा स्टार खेळाडू केविन पीटरसन बॅटला सिलिकॉन टेप्स लावल्याच्या वृत्ताने संतप्त झाला आहे. तो म्हणाला, ही खोटी पत्रकारिता आहे. या वादात मला जाणिवपूर्वक गोवले जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मी बॅटला सिलिकॉन टेप्स लावेल्या ज्यामुळे हॉटस्पॉटपासून बचाव होईल. हे पूर्णपणे असत्य वृत्त आहे. यामुळे खेळाडूंना त्रास होतो. मी बाद होण्यास घाबरत नाही. जर मला वाटले की, बॉल माझ्या बॅटला लागून गेला आहे तर, मी स्वतः मैदानाच्या बाहेर पडतो.