आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Beat India To Set Up Tri Series Final Against Australia

टीम इंडियाचे पॅकअप, उपांत्य सामन्यात इंग्लंड 3 गड्यांनी विजयी; रविवारी फायनल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ- तिस-या लाजिरवाण्या पराभवासह भारतीय संघाला तिरंगी मालिकेतून बाहेर पडावे लागले. इंग्लंडने शुक्रवारी उपांत्य सामन्यात तीन गड्यांनी भारतावर मात केली. यासह इंग्लंडने मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अाता रविवारी इंग्लंड व अाॅस्ट्रेलिया यांच्यात मालिकेची फायनल हाेणार अाहे.
जाेस बटलर (६७) व जेम्स टेलर (८२) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने लक्ष्य गाठले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला ४८.१ षटकांत २०० धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४६.५ षटकांत सात गड्यांच्या माेबदल्यात सामना जिंकला. गाेलंदाजीत भारताकडून स्टुअर्ट बिन्नीने तीन व माेहित शर्माने दाेन विकेट घेतल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर इयान बेल (१०) अाल्यापावलीच तंबूत परतला. माेहित शर्माने भारताला पहिला बळी मिळवून दिला. माेईन अली (१७), ज्याे रूट (३), कर्णधार माेर्गन (२) व रवी बाेपारा (४) हे झटपट बाद झाले.

बिन्नी, माेहितची खेळी व्यर्थ : स्टुअर्ट बिन्नी व युवा खेळाडू माेहित शर्माने केलेली धारदार गाेलंदाजीची खेळी व्यर्थ ठरली. बिन्नीने अाठ षटकांत ३३ धावा देत तीन गडी बाद केले. यात त्याने ज्याे रूट, माेर्गन अाणि बाेपाराला तंबूत पाठवले. तसेच माेहितने दाेन विकेट घेतल्या. त्यापाठाेपाठ शमी व अक्षर पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला.

टेलरचा झंझावात
टेलर व बटलरने सहाव्या गड्यासाठी १२५ धावांची भागीदारी केली. टेलरने १२२ चेंडूंचा सामना करताना चार चाैकारांच्या अाधारे संघाकडून सर्वाधिक ८२ धावा काढल्या.

रहाणेचे अर्धशतक
भारताकडून अजिंक्य रहाणेची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. त्याने संघाकडून सर्वाधिक ७३ धावा काढल्या. त्याने १०१ चेंडूंत तीन चाैकार व एका षटकाराच्या अाधारे ही अर्धशतकी खेळी केली.
पुढील स्‍लाईडवर पाहा सामन्याचे धावफलक...