आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Captain Alastair Cook In Test Series Win Over India, News In Marathi

धोनीसह टीम इंडियाला आर्थिक दंड, चूक परत झाली तर कर्णधारावर एका मॅचची बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत- इंग्‍लंड कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्‍ल्‍यामुळे भारतीय संघावर टीकेची झोड आहे. अशातच संघासाठी अजून एक वाईट बातमी आली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार धोनीवर सामन्याच्या मानधनापैकी 60 टक्के तर उर्वरित संघावर 30 टक्के दंड आकारण्यात आला आहे. वर्षभरामध्‍ये जर पुन्‍हा एकदा धोनीने मंदगतीने गोलंदाजी केल्‍यास धोनीवर एका सामन्‍याचा प्रतिबंधसुध्‍दा लावण्‍यात येऊ शकतो.

भारताच्‍या या लाजीरवण्‍या पराभवामुळे भारतीय संघाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागते आहे. धोनीच्‍या राजीनाम्‍याचीही मागणी क्रिडाप्रेमींनी केली आहे. तर इंग्‍लंच्‍या माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने भारतीय संघाची चांगलीच खिल्ली उडविली आहे.
इंग्‍लंडचा कर्णधार आनंदात
इंग्‍लडचा कर्णधार अँलिस्‍टर कुक सध्‍या खुप आनंदात आहे. ऑस्‍ट्रेलियाविरुध्‍द अॅशेस मालिका गमावल्‍यानंतर कुक टीकेचा धनी झाला होता. त्‍याची लय गेली होती. परंतु भारताविरुध्‍द कुकला चांगला सुर सापडला आणि त्‍यांनी भारताला 3-1 अशा फरकाने मालिका खिशात घातली. एका वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये कुक म्‍हणाला की, ''एवढ्या मोठ्या फरकाने आम्‍ही जिंकू असे स्‍वप्‍नातसुध्‍दा वाटत नव्‍हते.'

इंग्‍लड गोलंदाजांची अद्भुतपूर्व कामगिरी
इंग्‍लडचा गोलंदाज जेम्‍स अँडरसन आणि स्‍टुअर्ट ब्रॉड यांनी भारतीय फलंदाजी नेस्‍तनाबुत केली. तर पार्टटाइम फिरकीपटू मोइन अलीने त्‍याच्‍या फिरकीने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविली.

वापरले दबावतंत्र
कर्णधार अँलिस्‍टर कुकने सांगितले की, 'भारतीय संघ विजयानंतर खुप जोशात होता. परंतु साउथम्‍पटन कसोटीच्‍या पहिल्‍याच दिवशी गॅरी बॅलेंन्‍स आणि इयान बेल यांनी शतक झळकावल्‍यानंतर आम्‍ही भारतीय संघावर कायम दबाव आनला.'
'शेवटच्‍या दोन्‍ही सामन्‍यामध्‍ये आम्‍ही एक चांगली पारी खेळली आणि उच्‍च प्रतीची गोलंदाजी केली. रुटने अतिशय शानदार शतकी खेळी करुन भारताच्‍या विजयाच्या आशा धुसर केल्‍या.'
'अंतीम कसोटीमध्‍ये जो रुटने 149 धावांची खेळी करुन जवळजवळ आमच्‍या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.असेही कुक म्‍हणाला.
प्रशिक्षकांचे मानले आभार
इंग्‍लडचा कर्णधार कुकने प्रशिक्षक पीटर मूर आणि पॉल फारब्रेस यांचे आभार मानले. तर विजयामध्‍ये त्‍यांचा वाटा अवर्णनिय असल्‍याचेही त्‍याने म्‍हटले.

जेम्‍स अँडरसन ठरला हीरो
इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज जेम्‍स अँडरसनला मॅन ऑफ द सीरीज घोषित केले. त्‍याने या मालिकेमध्‍ये 25 विकेट मिळविल्‍या.

पुढील स्‍लाइडवर पाहा, ओवल कसोटी दरम्‍यानची काही निवडक छायाचित्रे...