आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Cricketer Gary Ballance Snapped At Nottingham Night Club, Divya Marathi

PHOTOS: भारताला पराभूत न करु शकल्‍यामुळे इंग्‍लड खेळाडूचा शर्ट उतरवून, दारु पिऊन धिंगाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत व इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी ड्रॉ झाली होती. त्‍यामुळे इंग्‍लडचा फलंदाज गॅरी बॅलेंसने शहरातील क्‍लबमध्‍ये जावून खूप दारु पिली आणि शर्ट उतरवून धिंगाणा घातला. गॅरी जोरजोरात ओरडत होता. 'आज मी क्रिकेटपटू नसून मद्यपी आहे' असे वाक्‍य बरळत होता. त्‍याची ही छायाचित्रे 'द टॅब नॅशनल' वेबसाइटच्‍या माध्‍यमातून संपूर्ण जगासमोर आली.
गॅरी बॅलेंससोबत जेम्‍स एंडरसन, जो रुट, आणि लियाम प्‍लंकेटही उपस्थित होते. नॉटिंघम कसोटीमध्‍ये अर्धशतक झळकलेल्‍या गॅरीला इंग्‍लड संघाच्‍या प्रशिक्षकांनी चांगला व्‍यव्‍हार करण्‍याची समज दिली.
रोडवर 'इंग्‍लड... इंग्‍लड'ची घोषणाबाजी
नॉंटिंघम कसाटी ड्रा झाल्‍यानंतर गॅरी काही तासातच पंडोरा बॉक्‍स क्‍लबमध्‍ये गेला आणि पार्टी केली. 'द टॅब नेशनल' वेबसाइटने गॅरीची क्‍लबमध्‍ये तसेच रोडवर धिंगाणा घालतानाची छायाचित्रे प्रसिध्‍द केली आहेत. त्‍यामध्‍ये गॅरी शर्टलेस होवून दारु पित असताना स्‍पष्‍ट दिसतो. घटनास्‍थळी असलेल्‍या काही व्‍यक्‍तीने सांगितले की, गॅरीने खुप दारु पिली होती. तो नशेमध्‍ये चुर झाला होता. त्‍याला चलताही येत नव्‍हते.
क्‍लबमध्‍ये त्‍याने सहावेळ ओडका आणि मुलींसाठी चार जॅगर्सची ऑर्डर दिली होती. तर टीप म्‍हणून 20 पाऊंड दिले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, गॅरी बॅलेंसची धिंगाणा घालतानाची छायाचित्रे..