आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • England Cricketer Stuart Broad Birthday Special News In, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'DAY: वयाच्‍या 17 व्‍या वर्षी मजूरी करत होता हा दिग्‍गज क्रिकेटपटू!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्‍लडचा स्‍टार क्रिकेटपटू स्‍टुअर्ट ब्रॉड आज 24 जून रोजी आपला 28 वा वाढदिवस साजरा करता आहे. इंग्‍लडचा एक यशस्‍वी गोलंदाज म्‍हणून त्‍याचा सध्‍या नावलौकिक आहे. परंतु आपल्‍यामध्‍ये कौशल्‍य विकसित करण्‍यासाठी त्‍याने मजूरीसुध्‍दा केली आहे.
ब्रॉडचे वडीलही व्‍यावसायिक गोलंदाज होते. त्‍यांच्‍याच पावलावर पाऊल ठेवत तो गोलंदाजीचे धडे गिरवायला लागला. गोलंदाजीमध्‍ये चांगले नैपूण्‍य मिळविण्‍यासाठी तो आस्‍ट्रेलियामध्‍ये गेला. तिथे मेलबोर्न मध्‍ये त्‍याने जिल्‍हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. परंतु लवकरच त्‍याला गरीबीशी तोंड द्यावे लागले. जवळील पैसे संपत असताना त्‍याने एका मजूरी करायला सुरुवात केली. ब्रॉड घरकामासाठी लागत असलेल्‍या सिमेंट आणि रेती यांचे मिश्रण करत असायचा. अशी माहिती त्‍याने 'द गार्जियन' या ब्रिटिश दैनिकाला दिलेली आहे.
भारतात लोकप्रिय
भारतातील क्रिकेट चाहत्‍यांमध्‍ये तो लोकप्रिय आहे. कारण युवराजसिंगने त्‍याला 2007 च्‍या टी-20 लढतीमध्‍ये सहा चेंडुमध्‍ये सहा षटकार लगावले होते.
मृत्‍यूशी सामना
' द गार्जियन' या दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये भारतातील ट्राफीकला त्‍याने मृत्‍यू असे संबोधले होते. 2008 मध्‍ये तो इंग्‍लड संघासमवेत भारत दौ-यावर आला होता.
वैयक्तिक आयुष्‍य
ब्रॉड इंग्‍लड क्रिकेटमधील प्‍लेबॉय आहे. नवीन गर्लफ्रेंड आणि ब्रेकअप यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. 2010 मध्‍ये ब्रिटीश मॉडेल केसी बार्नफील्‍ड सोबत असलेल्‍या अफेअरमुळे तो चर्चेत आला होता. त्‍याच दिवसांमध्‍ये लेक्‍सी पॅनविल नावाच्‍या मुलीसोबतही त्‍याचे सुत जुळले होते. तर सार्वजनिक कार्यक्रमामध्‍ये आपल्‍याकडे गर्लफ्रेंड बनवायला वेळच नसल्‍याचेही तो सांगत असतो.
पुढील स्‍लाइडवर पाहा, ब्रॉंडची काही खास छायाचित्रे...