आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लिश खेळाडूंनी खेळपट्टीवर दारू ढोसली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - क्रिकेट आता सभ्य गृहस्थांचा खेळ राहिला नाही. इंग्लिश खेळाडूंवर अ‍ॅशेस मालिकेतील विजयाचा कैफ इतका चढला की दारू ढोसून त्यांनी खेळपट्टीवर धिंगाणा घातला. इतकेच नव्हे, तर या खेळाडूंनी खेळपट्टीवर लघुशंका केल्याचाही आरोप आहे.


‘हेरॉल्ड सन’ने प्रकाशित केलेल्या एका बातमीनुसार इंग्लंडचे खेळाडू केविन पीटरसन, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी अ‍ॅशेस मालिकेत 3-0 असा मिळालेला विजय खेळपट्टीवर साजरा केला. अखेरचा कसोटी सामना ड्रॉ होताच इंग्लिश टीम विजयाच्या जल्लोषात बुडाली. खेळाडूंनी ड्रेसिंग रूम ते मैदानापर्यंत स्टेडियममध्ये फिरून प्रेक्षकांना अभिवादन केले. स्थानिक वेळेनुसार अखेरचा कसोटी सामना सायंकाळी साडेसात वाजता संपला. काही तासांनंतर इंग्लिश खेळाडू ड्रेसिंग रूममधून पुन्हा बाहेर मैदानावर आले आणि खेळपट्टीवर चारही बाजूंनी एकत्रित झाले. काही खेळाडूंनी कोरड्या खेळपट्टीवर लघुशंकासुद्धा केली. समोर मीडिया बॉक्समध्ये बसलेल्या पत्रकारांच्या डोळ्यांदेखत ही घटना घडली.


इंग्लंड आमच्यापेक्षा उत्तम
इंग्लिश संघ आमच्यापेक्षा उत्तम आहे. इंग्लंड या विजयाचा हक्कदार आहे. निकालच सर्वकाही बोलून जातो. इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली आहे. असे असले तरीही अखेरच्या तीन कसोटींत आम्ही चांगली कामगिरी केली.
क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार


प्रेक्षकांचे समर्थन
पाचही कसोटींच्या वेळी प्रेक्षकांनी आमचे जोरदार समर्थन केले. या संघाचे नेतृत्व करून स्वत:ला मी नशीबवान समजतो. ही अ‍ॅशेस ट्रॉफी जिंकणे माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक संस्मरणीय आणि गौरवशाली क्षण आहे.
अ‍ॅलेस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार