आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Defeat India By 32 Runs : Women World Cup

महिला विश्‍वचषक: भारताचा इंग्लंडकडून 32 धावांनी पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हरमनप्रीत कौरच्या (107) शानदार शतकानंतरही भारतीय महिला खेळाडूंचा इंग्लंडकडून आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत 32 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 272 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाला 9 बाद 240 धावाच काढता आल्या. इंग्लिश कर्णधार चार्लोट एडवर्डस्ला (109) प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. आता भारताचा पुढचा सामना 5 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेशी होणार आहे.
अ गटातील इतर एका सामन्यात वेस्ट इंडीजने श्रीलंकेला 209 धावांनी हरवले. या सामन्यानंतर अ गटात चारही संघ प्रत्येकी दोन गुणांसह सुपरसिक्समध्ये प्रवेशासाठी शर्यतीत कायम आहेत. नेट रन रेटच्या आधारे अ गटात वेस्ट इंडीज पहिल्या, भारत दुस-या , इंग्लंड तिस-या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे.


हरमनप्रीतचे शतक : धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. यजमान टीमने अवघ्या 29 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. हरमनप्रीतने विकेटकीपर कारू जैनसोबत (56) चौथ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. टीमच्या 135 धावा झाल्या असताना कारू जैन बाद झाली. एका टोकाने एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने हरमनप्रीतने शतक झळकावले. भारताला निर्धारित 50 षटकांत 9 बाद 240 धावाच काढता आल्या.

एडवर्ड्सची कॅप्टन इनिंग : तत्पूर्वी, चार्लोट एडवर्ड्सच्या कॅप्टन इनिंगमुळे इंग्लंडने 272 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. चार्लोटने 123 चेंडूंचा सामना करताना 16 चौकारांच्या मदतीने 109 धावा काढल्या. यासह महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम तिच्या नावे जमा झाला आहे.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड 50 षटकांत 8 बाद 272. (चार्लोट एडवर्ड्स 109, टेलर 35, ब्रिंडल 37, 2/50 झुलन, 2/56 निरंजना) वि.वि. भारत 9 बाद 240 (हरमनप्रीत कौर 107, कारू जैन 56, 4/29 ब्रुंट).