आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Defeated Australia By 57 Runs, Won First Match In Series

इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 57 धावांनी मात,मालिकेत मिळवला पहिला विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - कसोटीसह वनडे मालिकेत पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या इंग्लंडला अखेर शुक्रवारी विजयाचा सूर गवसला. या टीमने पराभवाची मालिका खंडित करताना चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 57 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल आठ सामन्यांनंतर (पाच कसोटींसह) इंग्लंडला विजयश्री मिळवता आली.
सामनावीर बेन स्टोक्सने (70 धावा, 4 बळी) अष्टपैलू कामगिरी करून इंग्लंडला मालिकेत पहिला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 8 बाद 316 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान टीमने 259 धावांवर गाशा गुंडाळला. दरम्यान अ‍ॅरोन फिंचने (108) केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली.
धावांचा पाठलाग करणा-या ऑस्ट्रेलियाला सलामीवीर मार्श आणि फिंचने 46 धावांची सलामी दिली. दरम्यान, टीम ब्रेसननने मार्शला (15) बाद केले. त्यानंतर मॅथ्यू वेडने (23) फिंचला मोलाची साथ दिली. मात्र, बोपाराने वेडला तंबूत पाठवले. त्यानंतर जॉर्ज बेली (11), स्मिथ (19), मॅक्सवेल (26), डी. ख्रिस्टियन (23) फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेऊ शकले नाहीत.