आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका: इंग्रजांपुढे भारताने गुडघे टेकले, भारताचा डाव अवघ्या १५३ धावांत आटोपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - फलंदाजांच्या गचाळ कामगिरीमुळे भारताला तिरंगी मालिकेत मंगळवारी सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करणा-या भारताचा डाव ३९.३ षटकांत अवघ्या १५३ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडने २७.३ षटकांतच लक्ष्य गाठले आणि बोनस गुणही मिळवला. पाच विकेट घेणारा स्टिवन फिंच "मॅन ऑफ द मॅच' ठरला. जेम्स अँडरसनने ४ गडी बाद केले. एक विकेट मोईन अलीने घेतली.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाने या सामन्यात दोन बदल केले. रोहित शर्माच्या जागी अंबाती रायडू आणि अश्विनच्या जागी स्टुअर्ट बिन्नीचा संघात समावेश करण्यात आला. मागच्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा स्नायू दुखावल्यामुळे खेळू शकला नाही.
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन (१) पुन्हा अपयशी ठरला. रोहितच्या जागी सलामीला आलेला अजिंक्य रहाणे (३३) आणि अंबाती रायडूने (२३) संघाचा स्कोअर ५७ पर्यंत पोहोचवला. या स्कोअरवर फिनला मारण्याच्या नादात रहाणे झेलबाद झाला. भारतीय फलंदाज जणू काही 'तू चल, मीही आलोच'ची भूमिका ठरवून खेळत होते की काय, असे दिसत होते. कोहली, रैना केव्हा आले आणि केव्हा गेले, कळलेच नाही. रायडू बाद होताच भारताचा स्कोअर ५ बाद ६७ धावा असा झाला.

बिन्नीने पोहोचवले १५० पर्यंत
कर्णधार धोनी (३४) आणि स्टुअर्ट बिन्नी (४४) यांनी डाव सावरला. दोघांनी ७० धावांची भागीदारी केली. भारताच्या १३७ धावा झाल्यानंतर फिनच्या गोलंदाजीवर धोनी बाद झाला. अक्षर पटेल त्रिफळाचित झाला. भुवनेश्वर फिनला हॅट्ट्रीकपासून रोखले, मात्र तो ५ धावांपेक्षा जास्त काढू शकला नाही. १५३ च्या स्कोअरवर बिन्नी व शमी बाद होताच भारताचा डाव आटोपला.

इंग्लंडने सहज गाठले लक्ष्य
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सलामीवीर इयान बेल (नाबाद ८८) आणि जेम्स टेलर (नाबाद ५६) यांच्या अर्धशतकांच्या बळावर २४.३ षटकांत १३१ धावा काढून विजय मिळवला. दोघांनी दमदार फलंदाजी केली.
पुढे पाहा धावसंख्‍या आणि गुणतालिका