आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजविरुद्ध इंग्लंड विजयाच्या स्थितीत, वेस्ट इंडीजला २५९ धावांवर रोखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाॅर्थ साउंड (अँटिग्वा) - येथील व्हिव्हियन रिचर्ड््स स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुस-या डावात यजमान वेस्ट इंडीजने दमदार खेळ केल्यानंतरही इंग्लंड संघ विजयाच्या स्थितीत आहे.

इंग्लंडने पहिल्या डावात ३९९ धावा उभारल्यानंतर वेस्ट इंडीजला २५९ धावांवर रोखले. त्यामुळे पाहुण्यांना १४० धावांची आघाडी मिळाली. दुस-या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाका कायम ठेवत ३३३ धावा उभारून डाव घोषित केला. परिणामी या संघाने एकूण ४७३ धावांची मजबूत आघाडी घेतली. दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या वेस्ट इंडीजने चौथ्या दिवसअखेर दोन फलंदाज गमावून ९८ धावा उभारल्या होत्या. डी. स्मिथ ५९ व मर्लन सॅम्युअल्स दोन धावांवर खेळत होते. शनिवारी सामन्याचा शेवटचा दिवस असून यजमानांना आणखी ३७५ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. इंग्लंडचा धारदार मारा बघता हे आव्हान वेस्ट इंडीजसाठी कठीण वाटत असल्यामुळेच पाहुण्यांची सामन्यावर पकड चांगलीच मजबूत झाली आहे. त्यामुळेच इंग्लंड अँटिग्वा येथे पहिल्या कसोटी विजयाच्या तयारीत आहे.

हंगामी गोलंदाज ज्यो रूटने इंग्लंडला दिवसाचा खेळ संपण्यास काही वेळ शिल्लक असताना ३२ धावांवर खेळणारा वेस्ट इंडीजचा फलंदाज डॅरेन ब्राव्होचा बळी मिळवून दिला. त्यामुळे विंडीजचे स्वप्न भंगले. आता यजमान वेस्ट इंडिज संघाची मदार ५९ धावांवर खेळणा-या डेव्होन स्मिथवर आहे. इंग्लिश गोलंदाजांनी क्रेग ब्रेथवेटला बाद करून दुस-या डावात बळींचे खाते उघडले होते.

गॅरी बॅलेन्सचे शानदार शतक
इंग्लंड धावांसाठी धडपडत असताना गॅरी बॅलेन्सने अप्रतिम फलंदाजीसह १२२ धावांची शतकी खेळी करून संघाची धावसंख्या मजबूत केली. कारकीर्दीतील नवव्या कसोटीत हे त्याचे चौथे कसोटी शतक होय. झिम्बाब्वेत जन्मलेल्या या डावखु-या फलंदाजाला रून आणि बेन स्टोक्सने कॅरेबियन गोलंदाजी उधळण्यास सुरेख सहकार्य केले.