आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाची धुलाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला ४-०ने चीत केल्यानंतर भारताला मागे टाकत आयसीसी रँकिंग मध्ये तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडने मंगळवारी मॅन्चेस्टरमध्ये पाच दिवसीय वनडे मालिकेतील शेवटचा समान्यात विजय मिळवत ४-०ने मालिका खिशात घातली. या विजयासह इंग्लंडचे ११८ गुण झाले आहेत. तर भारत ११७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर गेला आहे. या मालिका विजयमुळे इंग्लंडला ६ अंकाचा फायदा झाला आहे तर, वरच्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ४ गुण वजा झाले आहेत. यामुळे त्यांचे सिंहासन अबाधित राहिले असले तरी, त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे.
ऑस्ट्रेलियाकडे ११९ गुण आहेत, तर सुरुवातीच्या चार टीममध्ये केवळ दोन अंकांची तफावत आहे. टीम इंडिया ११२ गुणांसह पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेविरोधात आगामी पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आपले गमावलेले स्थान परत मिळवू शकते तसेच, या मालिकेच्या माध्यमातून टीम इंडिया पुढच्या पायरीवर देखील झेप घेऊ शकणार आहे.
आयसीसी रँकिंगमधील पहिले पाच संघ
१ - ऑस्ट्रेलिया
२ - दक्षिण अफ्रिका
३ - इंग्लंड
४ - भारत
५ - श्रीलंका
टीम इंडियामध्‍ये प्रवेशासाठी हे आहेत प्रबळ दावेदार
रोमांचक सामन्यात पाकिस्तानकडून एका धावेने टीम इंडियाचा पराभव