आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England s 6 year old sachin tendulkar gets big deal

सहा वर्षाच्‍या 'छोटया तेंडुलकरची' कमाल, पाहा व्‍ि‍हडिओ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- टीम इंडियाच्‍या खेळाडूंचे ऑस्‍ट्रेलियामध्‍ये खराब प्रदर्शन सुरू असल्‍यामुळे त्‍यांची ब्रँड व्‍हॅल्‍यू कमी होत आहे. तर दुसरीकडे सहा वर्षाच्‍या चार्ली एलिसनने एका बॅट बनवणा-या कंपनीशी करार करून इतिहास निर्माण केला आहे. चार्ली प्रायोजक मिळवणारा जगातील सर्वात छोटा क्रिकेटपटू बनला आहे.

चार्लीच्‍या फलंदाजीचा व्हिडिओ सध्‍या इंटरनेटवर धूमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्‍ये चार्ली प्रत्‍येक शॉट खूप सहजतेने खेळताना दिसतो. मोठया खेळाडूला जो शॉट खेळता येत नाही तो शॉट चार्ली सहजतेने खेळतो. त्‍याचा आत्‍मविश्‍वास आणि खेळ पाहून 'पिरी पिरी' या बॅट निर्मिती करणा-या कंपनीने त्‍याच्‍याशी करार केला आहे.

ब्रिटिश माध्‍यमांनी चार्लीला 'छोटा तेंडुलकर'ची उपमा दिली आहे. व्हिडिओमध्‍ये पाहा छोटया तेंडुलकरचे जलवे. (व्हिडिओ सौजन्‍य- द सन)