आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयन बेल आणि रविंद्र बोपारा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला 270 धावांचे आव्हान दिले. अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इयन बेलचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 91 धावांची दमदार खेळी केली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर इयन बेल आणि ऍलिस्टर कूक यांनी सावध सुरुवात केली. खेळपट्टी काहीशी संथ होती. तसेच कांगारुंनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे सलामीवीरांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. कुक 30 धावा काढून परतला. त्यानंतर बेल आणि जॉनथन ट्रॉट यांनी शतकी भागीदारी करुन इंग्लंडचा डाव सावरला. दोघेही धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात असतानाच ट्रॉट 43 धावा काढून बाद झाला. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला. त्यानंतर बेल 91 धावा काढून परतला. त्याने 115 चेंडुंमध्ये 7 चौकारांनी खेळी सजविली. परंतु, मधल्या षटकांमध्ये तो संथ खेळला. तो बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या 3 विकेट्स झटपट पडल्या. अखेरच्या षटकांमध्ये बोपाराने आक्रमक खेळी केली. बोपाराने 37 चेंडुंमध्ये 46 धावा काढल्यामुळे इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला.
जेम्स फॉकनर आणि क्लिंट मकाय यांनी प्रत्येकी 2, तर मिशेल स्टार्क आणि शेन वॉटसनने प्रत्येक 1 बळी घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.