आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Tennis Player Andi Marey News In Marathi News Couch

मॅरिस्मो होणार अँडी मरेची नवीन कोच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- इंग्लंडचा स्टार टेनिसपटू अँडी मरेने फ्रान्सच्या एमिलिया मॅरिस्मोला आपल्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले. मॅरिस्मो सध्या फ्रान्सच्या फेड संघाची कर्णधार आहे. ती माजी जागतिक नंबर वन टेनिसपटू आहे. सुरुवातीच्या करारानुसार मॅरिस्मो ग्रासकोर्टच्या सत्रासाठी मरेला प्रशिक्षण देईल. मार्चमध्ये कोच इवान लँडलशी काडीमोड झाल्यापासून मरे कोचविना सराव करत होता. दोन ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर मॅरिस्मोने 2009 मध्ये निवृत्ती घेतली होती. नंतर तिने मायकल लोर्डा, विक्टोरिया अझारेंका, मारियन बार्तोली सारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले होते. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये मरेला पराभवाचा सामना करावा लागला.