आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजविरुद्ध अाघाडी घेऊन इंग्लंड मजबूत, २२० धावांची घेतली आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटिग्वा - पाहुण्या इंग्लंड संघाचा दुसरा डाव प्रारंभी गडबडला असला तरी पहिल्या डावातील १०४ धावांच्या अाघाडीमुळे तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडला २२० धावांची अाघाडी मिळून त्यांची स्थिती मजबूत झाली अाहे.
जेरेमी ब्लॅकवूडने कारकीर्दीतील पहिले शतक झळकावत विंडीजच्या संघाला २९५ पर्यंत पाेहाेचविले. अन्यथा विंडीजला फाॅलाेअाॅनची नामुष्कीदेखील सहन करण्याची वेळ अाली असती. इंग्लंडचा फिरकी गाेलंदाज जेम्स ट्रेडवेलने ४७ धावांत ४ बळी घेत विंडीजला तीनशेच्या अात तंबूत धाडले. त्यानंतर इंग्लंडच्या जाेनाथन ट्राॅट अाणि अॅलिस्टर कुक या सलामीच्या जाेडीला जेराेम टेलरने झटपट माघारी पाठवले. त्यानंतर अालेला इयान बेलदेखील धावबाद झाल्याने त्यांची अवस्था ३ बाद ५२ अशी झाली हाेती. मात्र, त्यानंतर जाे रुटने नाबाद ३२ तर गॅरी बॅलन्सने नाबाद ४४ धावांची खेळी करीत संघाला शंभरच्या पार पाेहाेचविले.
विंडीजला सावरले ब्लॅकवूडने
तिसऱ्या दिवसाच्या प्रारंभीच्या सत्रात जेम्स ट्रेडवेलने शिवनारायण चंदरपाॅलचा अडथळा दूर करीत विंडीजच्या शेपटाचा प्रारंभ केला. त्यानंतर ब्लॅकवूडने बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत शतक झळकावले. त्याने नाबाद ११२ धावा केल्या.
शतकाचा अानंद अाैरच :ब्लॅकवुड
मी यापूर्वी तीन अर्धशतके झळकावली हाेती. मात्र, ती काेणाच्याच गणतीत राहत नाहीत. त्यामुळे पहिल्या शतकाचा अानंद काही अाैरच असल्याचेही ब्लॅकवूडने सांगितले. तसेच संघाला अावश्यकता असताना शतक करून संघाचा डाव सावरण्यात यशस्वी झाल्यामुळे अधिक अानंद झाल्याचेही त्याने नमूद केले.
केमार, रामदिन, हाेल्डर अपयशी
वेस्ट इंडीजच्या शिवनारायण चंद्रपॉलने ४६ धावांचे याेगदान दिले. मात्र, टीमच्या जेसन हाेल्डर (१६), केमार राेच (५), रामदीन (९) यांच्यासह चार जणांचे बळी १९ धावांत गमावल्याने विंडीजचा डाव २९५ धावांत संपुष्टात अाला.