मुंबई - येत्या 25 ऑगस्टपासून सुरू होणार्या इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी आणि एक ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यासाठी राष्ट्रीय निवड समितीने आज जाहीर केलेल्या संघात, संजू सॅमसन, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा, अंबाती रायडू, उमेश यादव, करण शर्मा या नव्या चेहर्यांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौर्यावर असलेल्या संघातील काही खेळाडू कसोटी मालिकेनंतर मायदेशी परततील. युवराजसिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले.
भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, महंमद शामी, मोहित शर्मा, अंबाती रायडू, उमेश यादव, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन, करण शर्मा.