आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England V India, Carlton Mid Tri Series At Brisbane

‍तिरंगी मालिका: इंग्लंडकडून भारताचा नऊ विकेट्‍सनी धुव्वा; 27 षटकातच गाठले लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- तिरंगी मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने भारताचा नऊ विकेट्‍स राखून धक्कादायक पराभव केला. इयान बेल (88) आणि जेम्स टेलर (54) या जोडीच्या नाबाद अर्धशतकीय कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने 154 धावांचे लक्ष्य फक्त 27.3 षटकात गाठले. याविजयासह इंग्लंडला एक बोनस गुण देखील मिळाला आहे. तिरंगी मालिकेत टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

बिन्नीने मोईन अली पाठवले तंबूत...
मोईन अलीच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. भारतीय गोलंदाज बिन्नीच्या चेंडूवर विराट कोहली याने अलीचा झेल घेतला. अलीने 8 धावा केल्या.

दरम्यान, टीम इंडियाने नाणेफेक ज‍िंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा संघ 153 धावांवर गुंडाळला. स्टुअर्ट बिन्नी याने सर्वाधिक 44 धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 34 धावा केला. इंग्लंडचा गोलंदाज स्टीव्हन फिन याने पाच तर जेम्स अँडरसन याने चार विकेट घेतले.

स्टीव्हन फिन याने तूफानी गोलंदाजी करत टीम इंडियाची फलंदाजीला सुरुंग लावला. शिखर धवन, विराट कोहली आणि सुरेश रैना एका पाठोपाठ तंबूत परतले. एकूण 67 धावसंख्येवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला. नंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि स्टुअर्ट बिन्नी यांने काही काळ डाव सावरला. मात्र, फिन याने धोनी आणि अक्षर पटेलला आउट केले. धोनी आउट झाला तेव्हा भारताची एकूण धावसंख्या 137 होती. नंतरच्या 16 धावांमध्ये भारताचे चार विकेट पडले.

नाणेफेक जिंकली पण खराब सुरुवात...
नाणेफेक जिंकूण मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का बसला. धवन पुन्हा एकदा अयशस्वी ठरला. धवन याने फक्त एक धाव काढली. नंतर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू या जोडीने टीम इंडियाला 50 धावांवर नेले. मा‍त्र, रहाणे 33 धावांवर बाद झाला. स्टीव्हन फिन याने रहाणेला आउट केले. फिन याने सलग पाचव्यांदा रहाणेला एकदिवसीय सामन्यात आउट केले.

ढेपाळला टीम इंडिया, 67 वर पाच फलंदाज तंबूत...
टीम इंडियाला पहिला झटका शिखर धवनच्या रुपात बसला. जेम्स एंडरसनच्या चेंडूवर विकेटकीपर जोस बटलरने शिखरची विकेट घेतली. धवनला पाच चेंडूत फक्त एक धाव काढता आली. धवनसोबत मैदानात उतरलेला सलामी फलंदाज अजिंक्य रहाणे हा देखील 33 धावा करून तंबूत परतला. स्टुअर्ट फिनच्या चेंडूवर टेलरने रहाणे याचा झेल घेतला. नंतर क्रीजवर आलेला उपकर्णधार विराट कोहली यानेही निराशा केली. फिनच्या चेंडूवर विराट बाद झाला. विराटने चार धावा केल्या. सुरेश रैनाला तर शुन्याचा भोपळाही फोडता आला नाही. मोईन अलीच्या चेंडूवर रैना आउट झाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आज (मंगळवारी) इंग्लंडविरूद्ध दोन हात करण्‍यासाठी मैदानात उतला आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, इंग्लंडने देखील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला. यामुळे दोन्ही संघ मालिकेत पहिल्या विजयासाठी या लढतीत एकमेकांशी झुंज सुरु आहे.

टीम इंडियाला या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत सुधारणेची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित आणि रैना यांना वगळता इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. गोलंदाजीत भुवनेश्वर आणि अक्षर यांनी कसून चेंडू टाकले. टीम इंडियाच्या इतर खेळाडूंची कामगिरी सरासरी ठरली. अशा परिस्थितीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीला खेळाडूंचा विश्वास वाढवताना अधिक आक्रमक खेळ करावा लागेल. सलामीवीर शिखर धवनचा हरवलेला फॉर्म चिंतेची बाब आहे.

दुसरीकडे कसोटीप्रमाणे विराट आणि रहाणे आपला फॉर्म कायम ठेवतील, अशी आशा आहे. गोलंदाजीत उमेश यादव आणि मो. शमी यांना धावा रोखताना विकेटही घ्याव्या लागतील. इंग्लंडचा विचार केला तर पहिल्या सामन्यात संघाबाहेर असलेला जेम्स अँडरसन या लढतीत पुनरागमन करतोय. यामुळे स्टीव्हन फिन बाहेर जाऊ शकतो. इंग्लंडच्या फलंदाजी क्रमात बदलाची आशा नाही. मागच्या सामन्यात शतक ठोकणारा कर्णधार मोर्गन, मोईन अली, इयान बेल, जो. रूटमुळे त्यांची फलंदाजी भक्कम आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे अँडरसन, क्रिस वोग्स, जॉर्डन, ब्राॅड असे गोलंदाज आहेत. दोन्ही संघांसाठी टाॅस महत्त्वाचा ठरेल.

दोन्ही संघ असे
भारत: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर, मो. शमी, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी. इंग्लंड: इयान मोर्गन (कर्णधार), इयान बेल, मोईन अली, जेम्स टेलर, जो. रुअ, रवी बोपरा, जोस बटलर, क्रिस वोग्स, ख्रिस जॉर्डन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा सामन्याचा रोमांच...