आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Vs Australia First Match In Tri Series In Australia 2015, Latest News In Marathi

Eng Vs Aus: फ्युकनर, स्‍टार्कच्‍या भेदक गोलंदाजीने इंग्‍लंडला 234 धावांत गुंडाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- तिरंगी लढतीतील पहिला सामना ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍द इंग्‍लंड सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु आहे. इंग्‍लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्‍लंडने सर्वबाद 234 धावा केल्‍या. इंग्‍लंड संघ 47.5 चेंडूत ऑल आउट झाला.
स्‍टार्कने चार तर फ्युकनरने तीन विकेट घेत इंग्‍लंडच्‍या डावाला सुरुंग लावला. 136 धावसंख्‍येवर जोस बटलरची विकेट पडली. त्‍याला केवळ 28 धावांवर फ्युकनरने डेविड वॉनर्रकरवी झेलबाद केले
12 धावांवर परतले तीन फलंदाज
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या इंग्‍लंडचे सलामीवीर जास्‍त काळ खेळपट्टीवर तग धरु शकले नाही. केवळ 21 धावांवर इंग्‍लंडचे तीन फलंदाज तंबूत परतले. ऑस्‍ट्रेलियाच्‍या स्टार्कने इयान बेलला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. बेल खातेही उघडू शकला नाही. तसेच टेलर आणि जो रुट आल्‍यापावली परतले.
अँडरसन दुखापतीमुळे बाहेर
गुडघ्‍याच्‍या दुखापतीमुळे इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज जेम्‍स अँडरसन सामन्‍यात खेळू शकणार नाही. कर्णधार मोर्गनने म्‍हटले की, ‘अँडरसनने आठवड्यातून तीन सामनेच खेळावेत. त्‍याच्‍यावर ताण पडू नये याची आम्‍ही काळजी घेत आहोत.
उभय संघ-
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्ती, फ्युकनर, अॅरोन फिंच, ब्रेड हॅडिन, जोस हॅझलवूड, मिशेल जॉन्सन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, गुरविंदर संधू.

इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), मोईन अली, अँडरसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अॅलेक्स हाल्स, क्रिस जॉर्डन, ज्यो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, क्रिस वोक्स.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यातील रोमहर्षक क्षण...