आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड-ब्राझील लढत बरोबरीत; आयर्लंडची जॉर्जियावर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दि जानेरिओ- घरच्या मैदानावर यजमान ब्राझीलने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात पाहुण्या इंग्लंड टीमला 2-2 ने बरोबरीत रोखले. पाऊलिन्होने गोल्डन गोल करून यजमान टीमचा पराभव टाळला. आगामी फुटबॉल स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करण्यात आले.

ब्राझील-इंग्लंड यांच्यात हा रोमांचक सामना मध्यंतरापर्यंत 0-0 ने बरोबरीत खेळवला गेला. अखेर सामन्याच्या 57 व्या मिनिटाला फ्रेडने ही कोंडी फोडली. त्याने फील्ड गोल करून यजमानांना 1-0 ने आघाडी मिळवून दिली. मात्र, या टीमला ही आघाडी फार काळ कायम ठेवता आली नाही. अँलेक्स ओक्सलाडेने 68 व्या मिनिटाला गोल केला. या गोलच्या बळावर पाहुण्या टीमने सामन्यात 1-1 ने बरोबरी मिळवली. त्यानंतर 11 मिनिटांनी वायने रुनीने गोल करून इंग्लंडला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. घरच्या मैदानावर पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी ब्राझीलने आक्रमक खेळी केली. अखेर, 83 व्या मिनिटाला पाऊलिन्होने यजमानांवरचे पराभवाचे सावट दूर करण्यात यश मिळवले. त्याने सुरेख गोल करून सामन्यात 2-2 ने बरोबरी मिळवली.

आयर्लंडने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात जॉर्जियाचा पराभव केला. रोब्बीईने (77, 88 मि.) केलेल्या दोन गोलच्या बळावर आयर्लंडने 4-0 असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्यात रिचर्ड केओग (42 मि.) व सिमोन कोक्स (48 मि.) यांनीही गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.