आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Vs Shrilanka One Day Cricket Match, Sports

इंग्लंडची विजयी सलामी; श्रीलंकेचा 81 धावांनी पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अष्टपैलू खेळाडू क्रिस जॉर्डनच्या 3 बळी आणि 38 धावांच्या आक्रमक खेळीच्या भरवशावर इंग्लंडने वनडेत श्रीलंकेचा 81 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा वनडे रविवारी होणार आहे.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 6 गडी बाद 247 धावा काढल्या होत्या. कर्णधार अँलेस्टर कूक केवळ 11 धावा काढून बाद झाल्यानंतर इयान बेल (50 धावा) आणि बॅलेन्स (64 धावा) यांनी दुसर्‍या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रूटनेसुद्धा 45 धावा काढून इंग्लंडला चांगल्या धावसंख्येकडे नेले. मोर्गन, बोपारा व बटलर स्वस्तात बाद झाले.

श्रीलंकेला पावसाचा तडाखा
इंग्लंडचा डाव सुरू असतानाच 20 षटकांत पावसाने मैदानात हजेरी लावली. दरम्यान, काही वेळ सामना थांबवण्यात आला. त्यामुळे श्रीलंकेला थोडाफार दिलासा मिळाला. तेव्हा इंग्लंडचा संघ 1 बाद 101 धावसंख्येवर खेळत होता. मात्र, त्यानंतर पंचाने हा सामना 39 षटकांचाच खेळवण्याचे आदेश दिले.