आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबर्मिंगहॅम- सलामीवीर इयान बेलच्या (91) शानदार खेळीनंतर जेम्स अँडरसनच्या (3 विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अ गटात ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी नमवले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 269 धावा काढल्या, प्रत्युत्तरात कांगारूंना 50 षटकांत 9 बाद 221 धावाच काढता आल्या.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार जॉर्ज बेली (55) आणि फ्युकनर (नाबाद 54) यांनी अर्धशतके काढली. वॉर्नर (9), वॉटसन (24), ह्युजेस (30) यांनी निराशा केली.
तत्पूर्वी इंग्लंडकडून बेलशिवाय कर्णधार अॅलेस्टर कुकने 30, जोनाथन ट्रॉटने 43 आणि रवी बोपाराने नाबाद 46 धावा काढल्या. टीम ब्रेसनने नाबाद 19 धावांचे योगदान दिले. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुक आणि बेल यांनी पहिल्या विकेटसाठी 11.4 षटकांत 57 धावांची भागीदारी केली. बेलने यानंतर ट्रॉटसोबत दुसºया विकेटसाठी 111 धावा जोडल्या. एकवेळ इंग्लंडची टीम 34 षटकांत 1 बाद 168 धावा अशा मजबूत स्थितीत होती. मात्र, नंतर यजमान टीमने 45 धावांत 5 विकेट गमावल्या आणि इंग्लंडचा स्कोअर 44 व्या षटकात 6 बाद 213 धावा असा झाला. बोपारा आणि बे्रसननने सातव्या विकेटसाठी 6.5 षटकांत 56 धावांची भागीदारी करून इंग्लंडला आव्हानात्मक स्कोअर गाठून दिला.
बोपाराने 37 चेंडूंत 46 धावा काढल्या. यात त्याने 1 षटकार आणि 3 चौकार मारले. ब्रेसननने 20 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 19 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 6 बाद 269 (इयान बेल 91, रवी बोपारा 46*, ट्रॉट 43, 2/38 क्लायंट मॅके, 2/48 जेम्स फ्युकनर).
ऑस्ट्रेलिया : 9 बाद 221 (जॉर्ज बेली 55, जेम्स फ्युकनर नाबाद 54, 3/30 अँडरसन, 2/45 टीम ब्रेसनन)
बेल चमकला
91 धावा
115 चेंडू
07 चौकार
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.