आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक रात्र फुटपाथवर झोपायचंय या सुपरमॉडेलला, स्टार फुटबॉलरची आहे Wife

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅम कुक आधी प्रोफेशनल DJ राहिली आहे. - Divya Marathi
सॅम कुक आधी प्रोफेशनल DJ राहिली आहे.
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडच्या स्टार फुटबॉलरच्या पत्नीची एक रात्र फुटपाथवर झोपण्याची इच्छा आहे. ती आहे सॅम कुकी. सॅम सुपरमॉडेल आहे, मात्र, तरीही तिला एक रात्र रस्त्यावर काढायची आहे. याचे कारण चॅरिटीसाठी पैसा गोळा करमे. सॅमच्या कामाला तिचा फुटबॉलर पती ख्रिस स्मॅलिंग सुद्धा साथ देत आहे. यासाठी रात्र रस्त्यावर काढायची आहे.....
- सॅम कुक आणि तिच्या तीन मैत्रिणी सध्याच्या कडाक्याची थंडीत एक रात्र रस्त्यावर काढू इच्छितात.
- त्या यासाठी असे करत आहेत की, रोज जे अनाथ लोक रस्त्यावर रात्रभर झोपतात त्यांना कसे वाटत असेल हे जाणून घेण्यासाठी.
- सॅमच्यानुसार, ‘माझ्या मनात अशा लोकांबाबत प्रचंड सहानुभूती आहे जे फुटपाथवर राहतात.’
- ‘मी अशा अनेक कहाण्या ऐकल्या आहेत रस्त्यावर रात्रभर थंडीत झोपल्याने एखाद्याचा मृत्यू कसा होतो. अशी वेळ यापुढेही रस्त्यावर झोपणा-यावर येऊ शकते.’
- ‘रस्त्यावर, मोकळ्या ठिकाणी झोपणे किती अवघड बाब आहे. खासकरून अशा दिवसात जेव्हा प्रचंड थंडीचा काळ असतो.’
- ‘मी हे सर्व यासाठी करत आहे कारण ख्रिसमसच्या आधी आपल्यासारख्या सामान्यपण जगणा-या लोकांना जाणीव व्हावी व या लोकांची स्थिती त्यांच्यापर्यंत पोहचावी व विचार करावा.’
- ‘आपल्या व्यस्त आयुष्यात कोणाचेच लक्ष त्यांच्याकडे जात नाही त्यामुळे असे काही करणे माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा असेल.’
- या उपक्रमांतून चॅरिटी वर्कसाठी सुमारे 2500 पाउंड (2 लाख 14 हजार रुपये) रक्कम मिळण्याचा अंदाज आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पेज 3 गर्ल राहिलेल्या सॅम कुकचे ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...