Home »Sports »Other Sports» English Ff Cup Football Competation : Machestar United Reach Semifinal Round

इंग्लिश एफएफ चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर युनायटेडची उपांत्यपूर्व फेरीत दाखल

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 02:49 AM IST

  • इंग्लिश एफएफ चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर युनायटेडची उपांत्यपूर्व फेरीत दाखल

मॅँचेस्टर - यजमान मॅँचेस्टर युनायटेडने इंग्लिश एफएफ चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यजमान युनायटेडने नानी (69मि.) व हेर्नाडेझ (72) यांनी केलेल्या गोलच्या बळावर रीडिंग संघाचा 2-1 ने पराभव केला. रीडिंगकडून मॅकअनुफीने 81 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. मात्र, त्याला लढतीत बरोबरी मिळवता आली नाही. मॅँचेस्टर युनायटेडचा नानी सामनावीरचा मानकरी ठरला.

घरच्या मैदानावर दमदार सुरुवात करण्याच्या यजमानांचा प्रयत्न पाहुण्या रिडींगच्या खेळाडूंनी यशस्वी होऊ दिला नाही. रीडिंगच्या सुरेख खेळीमुळे युनायटेडला दुस-या हाफपर्यंत गोल करण्यासाठी झुंजावे लागले. तब्बल 68 व्या मिनिटापर्यंत हा रोमांचक सामना 0-0 ने बरोबरीत खेळवला गेला. अखेर, 69 व्या मिनिटाला नानीने यजमानांकडून गोलचे खाते उघडले. या गोलच्या बळावर युनायटेडने 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत हेर्नाडेझने वैयक्तिक पहिला व युनायटेडकडून दुसरा गोल केला. या गोलच्या बळावर यजमानांनी आघाडीला 2-0 ने मजबूत केले. पिछाडीवर पडलेल्या रीडिंगला 81 व्या मिनिटापर्यंत गोलचे खाते उघडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. मॅकअनुफीने हा गोल करून रीडिंगचे खाते उघडले.मात्र, त्यानंतर रीडिंगला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही. युनायटेडने हा सामना 2-1 ने जिंकला. या विजयासह युनायटेडने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

उपांत्यपूर्व फेरीत चेल्सीसोबत सामना
मॅँचेस्टर युनायटेडचा उपांत्यपूर्व सामना चेल्सीसोबत होणार आहे. या लढतीत मॅँचेस्टर युनायटेडला विजयासाठी मोठी कसरत करावी लागेल. दुसरीकडे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी चेल्सी सज्ज आहे.

माद्रिदचा 2-0 ने विजय
दुसरीकडे रियल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये रायो व्हॅलेकानोवर 2-0 ने विजय मिळवला. अल्वारो मोराटा ( 3 मि.) व रामोस (12 मि.) यांनी गोल करून माद्रिदचा विजय निश्चित केला. व्हॅलेकानोला शेवटच्या मिनिटापर्यंत गोलचे खाते उघडता आले नाही.हा रियल माद्रिदचा घरच्या मैदानावरचा चौथा विजय ठरला.

Next Article

Recommended