आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Premier League: Chelsea Hammers Arsenal 6 0 News In Marathi

इंग्लिंश प्रीमियर लीग : चेल्सीकडून आर्सेनलचा धुव्वा; सिटीचा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - चेल्सीने इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये आर्सेनलचा 6-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. या विजयासह चेल्सीने गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. लिव्हरपूलने दोन गुणांच्या आघाडीने मॅँचेस्टर सिटीवर कुरघोडी करून गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप घेतली. त्यामुळे सिटीची तिसर्‍या स्थानी घसरण झाली.

ऑस्कर (42, 66 मि.), इटो (5 मि.), सुर्लेले (7 मि.), हझार्ड (17 मि.) आणि सालेह (71 मि.) यांनी शानदार गोल करून चेल्सीला एकतर्फी विजय मिळवून दिला. मॅँचेस्टर सिटीची फुल्हामवर मात : टुरोने (26, 54, 65 मि.) गोल करून मॅँचेस्टर सिटीला शानदार विजय मिळवून दिला. या टीमने फुल्हामवर 5-0 ने एकतर्फी विजय निश्चित केला. फर्नाडिन्हो (84 मि.) आणि डेमिचेल्लीस (88 मि.) यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी एक गोलचे योगदान दिले.