आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Primer Football League : Tevej's Goal ; City Win

इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग : तेवेजचा गोल; सिटी विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - कार्लोस तेवेजने केलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये अ‍ॅस्टोन व्हिलावर 1-0 ने विजय मिळवला. गुणतालिकेत दुस-या स्थानी असलेल्या सिटीचा लीगमधील हा सतरावा विजय ठरला.

अ‍ॅस्टोन व्हिलाविरुद्ध सामन्यात मँचेस्टर सिटीला 45 व्या मिनिटाला आघाडी घेता आली. कार्लोस तेवेजने सिटीकडून गोलचे खाते उघडले. यासाठी सिटीला चांगलीच झुंज द्यावी लागली. अ‍ॅस्टोनविरुद्धची आघाडी मजबूत करण्यासाठी सिटीने तब्बल 20 वेळा गोलपोस्टवर हल्ला चढवला. यात त्यांना यश आले.
गुणतालिकेत 18 व्या स्थानी असलेल्या अ‍ॅस्टोनच्या गोलरक्षकाने सिटीचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दुसरीकडे अ‍ॅस्टोनने गोलसाठी दहा वेळा प्रयत्न केला.