आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Primer Football League : West Bromwich Albiow Defeat Liverpool

इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग :वेस्ट ब्रोमविच अल्बिओनकडून लिव्हरपूलचा पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- वेस्ट ब्रोमविच अल्बिओनने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये लिव्हरपूलला 2-0 अशा फरकाने पराभूत केले. मॅकअ‍ॅली (81 मि.) व लुकाकू (90 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर ब्रोमविचने विजय मिळवला. शेवटपर्यंत लिव्हरपूलला लढतीत गोलचे खाते उघडता आले नाही. लिव्हरपूलचा हा लीगमधील आठवा पराभव ठरला.

या लढतीतील विजयासह ब्रोमविचने गुणतालिकेत आठव्या स्थानावर धडक मारली. लिव्हरपूलची नवव्या स्थानी घसरण झाली. लिव्हरपूलविरुद्ध सामन्यात ब्रोमविचने सुरेख खेळी केली. ही लढत 80 व्या मिनिटापर्यंंत 0-0 ने बरोबरीत खेळवली गेली. या दरम्यान, लिव्हरपूलने तब्बल 25 वेळा गोल करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, ब्रोमविचच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.

दुसरीकडे ब्रोमविचने पाच वेळा गोलपोस्टवर हल्ला चढवला. यामध्ये मॅकअ‍ॅली व लुकाकुनेने अनुक्रमे 81 व 90 व्या मिनिटाला गोल करून संघाला लिव्हरपूलवर 2-0 ने आघाडी मिळवली दिली. या दोन गोलच्या बळावर ब्रोमविचने विजय निश्चित केला.

2-0 ने ब्रोमविच विजयी
81 मिनिटाला पहिला गोल
90 मिनिटाला दुसरा गोल