आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटीची युनायटेडवर मात; टॉटेनहॅमचा शानदार विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर - इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत सेर्गियो आगुइरोने (६३ मि.) मँचेस्टर सिटीला शानदार विजय मिळवून दिला. त्याने केलेल्या गोलच्या बळावर सिटीने रंगतदार लढतीत मँचेस्टर युनायटेडचा १-० अशा फरकाने पराभव केला. यासह युनायटेडला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या शानदार विजयासह मँचेस्टर सिटीने गुणतालिकेत तिस-या स्थानावर धडक मारली. या संघाचे एकूण २० गुण झाले आहेत. चेल्सी संघ २६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
लढती बाजी मारण्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चुरशीची खेळी केली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत ही रंगतदार लढत शून्य गोलने बरोबरीत होती. अखेर दुस-या हाफमध्ये सिटीने लढतीत दमदार पुनगरामन केले. सेर्गियोने सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीकडून गोलचे खाते उघडले. या गोलसह सिटीने लढतीतील आपला विजय निश्चित केला. दरम्यान, युनायटेडच्या खेळाडूंनी लढतीत बरोबरी साधण्याचा केलेला प्रयत्न अयपशी ठरला. मात्र, या संघाच्या खेळाडूला शेवटच्या मिनिटांपर्यंत लढतीत गोलचे खाते उघडता आले नाही.

कानेचा शानदार गोल
बर्मिंगहॅमच्या मैदानावर टॉटेनहॅम हास्टपूरने लढतीत शानदार विजयाची नोंद केली. या संघाने अ‍ॅस्टोन व्हिलावर २-१ अशा फरकाने मात केली. एन. चाल्डी (८४ मि.) आणि एच. काने (९० मि.) यांनी प्रत्येकी एका गोलच्या बळावर टॉटेनहॅमला विजय मिळवून दिला. अ‍ॅस्टोन व्हिलासाठी वेईमनने १६ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. टॉटेनहॅम संघाने ईपीएलच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर धडक मारली. कानेने शेवटच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे टॉटेनहॅमला विजय मिळवता आला.