मँचेस्टर - वायने रुनी (१२ मि.), जुआन माटा (४० मि.) आणि राॅबिन वान पर्सेई (७१ मि.) यांनी मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर फुटबाॅल लीगमध्ये शानदार विजय मिळवून दिला. या संघाने सामन्यात िलव्हरपूलचा ३-० अशा फरकाने धुव्वा उडवला. या सामन्यातील विजयासह युनायटेडने गुणतालिकेत तिस-या स्थानी धडक मारली. या संघाच्या नावे आता २१ गुण झाले. चेल्सी आणि मँचेस्टर सिटी अनुक्रमे अव्वल आणि दुस-या स्थानावर कायम आहे.
वायने रुनीने सामन्यात मँचेस्टर युनायटेडला दमदार सुरुवात करून दिली. त्याने १२ व्या मिनिटाला सामन्यात गाेलचे खाते उघडले. यासह युनायटेडने लढतीत १-० ने आघाडी मिळवली. त्यानंतर तब्बल २८ मिनिटानंतर जुआन माटाने युनायटेडच्या आघाडीला २-० ने मजबूत केलेे. त्याने सामन्याच्या ४० व्या मिनिटाला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुस-या गाेलची नाेंद केली. या गाेलमुळे मँचेस्टर युनायटेडला मध्यंतरापूर्वी २-० ने सामन्यात माेठी आघाडी घेता आली.
दरम्यान, गाेलचे खाते उघडण्यासाठी िलव्हरपूरच्या खेळाडूंनी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, या संघातील खेळाडूंना अपेक्षित यश शेवटच्या मिनिटांपर्यंत मिळाले नाही. त्यानंतर राॅबिन वान पर्सेईने दुस-या हाफमध्ये शानदार गाेल केला. यासह त्याने युनायटेडचा एकतर्फी विजय निश्चित केला.
स्वानसाविरुद्ध लढतीत टाॅटेनहॅम २-१ ने विजयी
टाॅटेनहॅम हाॅस्टपूरने विजयी माेहीम अबाधित ठेवताना ईपीएलमध्ये आगेकूच केली. या संघाने रविवारी रात्री स्वानसा सिटीवर २-१ अशा फरकाने मात केली. एरिकसनने (८९ मि.) केलेल्या गाेलच्या बळावर टाॅटेनहॅमने सामना जिंकला. तसेच संघाच्या विजयात एच.कानेने एका गाेलचे याेगदान दिले. स्वानसा सिटीसाठी सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला बाेनीने गाेल केला. मात्र, त्याला स्वानसा सिटी संघाचा पराभव टाळता आला नाही.