आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्‍ये फलंदाजीचा आनंद लुटतोय- कार्तिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयपीएलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना मी आनंद लुटतोय, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केली. कार्तिकच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने स्पध्रेत दोन सामने जिंकले. टी-20 च्या आक्रमक खेळात कार्तिकने पॉवर प्लेचा चांगला उपयोग केला होता. त्याने स्पर्धेतील तीन सामन्यांत 183 धावा काढल्या आहेत.

यावर कार्तिक म्हणाला, ‘हे सत्र माझ्यासाठी चांगले ठरले आहे. मी देशांतर्गत क्रिकेट स्पध्रेतही चांगल्या धावा काढल्या होत्या. तीच लय मी आयपीएलमध्येसुद्धा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे तो म्हणाला.