आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ernestine Shepherd, 77 Year Old Bodybuilder News In Divya Marathi

वयाच्या 77 व्या वर्षीही दररोज धावते 10 किमी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - वयाच्या साठीनंतर प्रत्येकाला निवृत्तीचे वेध लागले असतात. कोणी मुलांसोबत राहण्याचे, समाजसेवा करण्याची स्वप्ने रंगवत असतो. त्यातही तब्येत हवी तशी साथ देताना दिसत नाही. मात्र, वयाच्या 77 व्या वर्षी एखादी व्यक्ती दररोज 10 किलोमीटर सहजपणे धावणे हे खरंच आश्चर्याची बाब आहे. अर्नेस्टाइन शॅफर्ड असे या महिलेचे नाव आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध महिला बॉडी बिल्डर्सपैकी एक. सकाळी 2.30 वाजता उठून 10 किलोमीटर अंतर धावायचे आणि त्यानंतर जिममध्ये तासन्तास व्यायाम करायचा ही त्यांची दिनचर्या. याच मेहनतीच्या बळावर त्यांनी आतापर्यंत शॅपर्ड स्पर्धेत अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

या फिट राहण्यामागच्या रहस्याबद्दल शॅपर्ड म्हणतात की, वय वाढणे हे आपल्या हाती नसते. मी 77 वर्षांची असूनही आज तंदुरुस्त आहे. सध्या मला कोणताच आजार नाही. तारुण्यात जे विकार मला जडले होते, ते नियमित व्यायामामुळे पळून गेले आहेत. या वयात इतर महिला तणाव आणि मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त असतात; परंतु मला यापैकी कोणताच आजार नाही. मी माझ्या बहिणीसोबत मिळून आधी व्यायाम करायची. 56 व्या वर्षी तिचे निधन झाले आणि मी तणावात गेले. त्यानंतर परत नव्या जोमाने व्यायामाला सुरुवात केली.

पतीची साथ मिळाली
शॅफर्ड सांगतात की, जेव्हा अन्य महिला माझ्या तब्येतीचे रहस्य विचारतात, तेव्हा मला खूप चांगले वाटते. मी त्यांनासुद्धा चांगला व्यायाम, चांगल्या आहाराचा सल्ला देत असते. शॅफर्ड बॉडी बिल्डिंगमधील आपल्या यशाचे हे श्रेय पती कोलिन शॅफर्डला देतात. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे आज मी या ठिकाणी आहे. त्यांनी दररोज सकाळी उठवून मला पळायला लावले, असे शॅफर्ड सांगतात.