आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Euro Cup Football Tournament To Begin From Tomorrow

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरो चषकाचा थरार उद्यापासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉर्सा - लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा युरो चषकाला येत्या 8 जूनपासून प्रारंभ होत आहे. विश्वविजेता आणि गतचॅम्पियन स्पेनकडे तिस-यांदा विजेतेपद पटकावून यंदा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. यापूर्वी फक्त जर्मनीने तीन वेळा स्पर्धा जिंकण्याचा इतिहास रचला आहे. आता ही संधी स्पेनकडे आहे. स्पेनशिवाय फ्रान्सने दोन वेळेस युरो चषकात बाजी मारली आहे.
चेकोस्लोवाकिया, डेन्मार्क, जर्मनी, ग्रीस, इटली, हॉलंड आणि सोव्हिएत रशिया यांनी प्रत्येकी एक वेळा स्पर्धा जिंकली आहे. पश्चिम जर्मनीने दोन वेळा आणि जर्मनीने एक वेळा स्पर्धा जिंकली. पश्चिम जर्मनी आणि जर्मनी आता एकत्रित (एकूण 3) झाले आहेत. मात्र, सोव्हिएत युनियन आणि चेकोस्लोवाकियाची फाळणी झाली आहे.
स्पेनची टीम क गटात क्रोएशिया, आयर्लंड, इटली यांच्यासोबत आहे. गेल्या वेळेसचा उपविजेता संघ जर्मनी ब गटात असून, यात डेन्मार्क, हॉलंड आणि पोर्तुगालच्या टीम आहेत. अ गटात चेक गणराज्य, ग्रीस आणि यजमान पोलंडसह रशिया आहे. दुसरा यजमान युक्रेनला इंग्लंड, फ्रान्स आणि स्वीडनसह ड गटात स्थान मिळाले आहे.
08 जूनला दोन सामने
पहिला सामना : पोलंड वि. ग्रीस (8 जून, नॅशनल स्टेडिमय)
स्टेडियमची क्षमता : 50 हजार
पोलंड-ग्रीस युरो चषकात आतापर्यंत : एकूण 15 सामने, पोलंडने 10 जिंकले, 3 गमावले आणि दोन सामने ड्रॉ.
दुसरा सामना : रशिया वि. चेक गणराज्य.
सामना रंगणार : ब्रोकलाव येथे.
दोन्ही संघ युरो चषकात आमने-सामने : फक्त एक वेळा (3-3)