आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Europ Football League News In Marathi, Benfisa, Divya Marathi

युरोप फुटबॉल लीग: बेन्फिसा, जुवेंट्स अंतिम आठमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - युरोप फुटबॉल लीगमध्ये गुरुवारी बेन्फिसा आणि टॉटेनहॅम या तुल्यबळ संघादरम्यान खेळला गेलेला सामना 2-2 ने बरोबरीत सुटला. मात्र, अवांतर वेळेत 5-3 ची यशस्वी सरासरी राखल्याने त्यांच्या उपउपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. दुसरीकडे जुवेंट्सने लढतीत फिओरेंटिनावर 1-0 ने मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.


बेन्फिसा आणि टॉटनहॅमदरम्यानची लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण होती आणि त्यासाठी दोन्ही संघांनी जोमाने प्रयत्नही चालवले होते. मागच्या आठवड्यात व्हाइट हार्टलेनमध्ये खेळल्या गेलल्या सामन्यात बेन्फिसाने 3-1 ने विजय मिळवल्यामुळे या सामन्यातही त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. दरम्यान, नेसर चॅडलीने लगातार दोन गोल करून टॉटेनहॅमला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र बेन्फिसाने यशस्वीरीत्या पुनरागमन करत त्यांच्या आशेवर पाणी फेरले आणि सामना 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. अन्य एका लढतीत जुवेंट्स संघाने फिओरेंटिनावर 1-0 ने निर्विवाद विजय मिळवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या 68 व्या मिनिटाला डिफेन्डर रॉड्रिग्जला पंचाने रेडकार्ड दाखवल्यामुळे फिओरेंटिनाला मोठा धक्का बसला.